एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मोहम्मद अलीम खान, अर्जुन प्रेमकुमार, राजेश्वर पटलोल्ला यांचे सनसनाटी विजय

पाचगणी। रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या मोहम्मद अलीम खान, कर्नाटकाच्या अर्जुन प्रेमकुमार, तेलंगणाच्या राजेश्वर पटलोल्ला या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 16 वर्षाखालील मुलांच्या गटात पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या कर्नाटकच्या अर्जुन प्रेमकुमार याने तिसऱ्या मानांकित गुजरातच्या हिरक व्होराचा 7-5, 6-2 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या मोहम्मद अलीम खान याने दहाव्या मानांकित मणिपूरच्या भूषण हॊबमचा 6-4, 3-6, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव केला. तेलंगणाच्या राजेश्वर पटलोल्ला याने आसामच्या अकराव्या मानांकित आकाश देबचा 6-1, 4-6, 6-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.

अव्वल मानांकित गुजरातच्या अर्जुन कुंडू याला महाराष्ट्राच्या प्रणव गाडगीळने कडवी झुंज दिली. अर्जुनने क्वालिफायर प्रणव गाडगीळचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(4) असा पराभव केला. महाराष्ट्राच्या जैष्णव शिंदेने आपला राज्य सहकारी नमित मिश्राचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून दुसरी फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: 16 वर्षाखालील मुले:

अर्जुन कुंडू(गुजरात)(1)वि.वि.प्रणव गाडगीळ(महाराष्ट्र)6-3, 7-6(4);
प्रणव हेगरे(कर्नाटक)वि.वि.सुखप्रीत सिंग(चंदीगढ) 6-3, 3-6, 7-6(4);
क्रिस नासा(महाराष्ट्र)वि.वि.काफिल कडवेकर(महाराष्ट्र)6-4, 6-4;
अनंत मुनी(आंध्रप्रदेश)(15)वि.वि.निरव शेट्टी(महाराष्ट्र)6-4, 6-4;
मोहम्मद अलीम खान(महाराष्ट्र)वि.वि.भूषण हॊबम(मणिपूर)(10) 6-4, 3-6, 6-3;
फरहान पत्रावाला(गुजरात)वि.वि.ज्ञानग्रहिथ मोवा(तेलंगणा) 6-4, 4-6, 6-3;
जैष्णव शिंदे(महाराष्ट्र)वि.वि.नमित मिश्रा(महाराष्ट्र)6-2, 6-3;
निथिलीयन एरीक(कर्नाटक)(6)वि.वि.शुभम कुंडू(कर्नाटक) 7-5, 6-3;
अर्जुन प्रेमकुमार(कर्नाटक)वि.वि.हिरक व्होरा(गुजरात)(3) 7-5, 6-2;
ओजस दबस(महाराष्ट्र)वि.वि.प्रज्वल तिवारी(महाराष्ट्र) 6-3, 6-1;
आयुश हिंदलेकर(महाराष्ट्र)वि.वि.लक्षय बात्रा(हरियाणा) 6-0, 6-4;
दीप मुनीम(मध्यप्रदेश)(14)वि.वि.वेदांत मिस्त्री(महाराष्ट्र) 6-4, 6-7(2), 6-4;
राजेश्वर पटलोल्ला(तेलंगणा)वि.वि.आकाश देब(आसाम)(11) 6-1, 4-6, 6-3;
रेथीन प्रणव(तेलंगणा)वि.वि.आर्यन कुरेशी(महाराष्ट्र) 6-1, 6-2.