खेलो इंडिया- गतविजेत्या हरयाणाचा धडाकेबाज प्रारंभ; ओडिशाकडून महाराष्ट्राला पराभवाचा धक्का

मुंबई । एकतर्फी लढतीत हरयाणाया गतविजेत्या संघाने झारखंडचा १०-० असा धुव्वा उडवित खेलो इंडिया २०१९ मधील हॉकीत २१ वषार्खालील युवकांच्या विभागात धडाकेबाज प्रारंभ केला. ही स्पर्धा येथील महिंद्रा हॉकी स्टेडियमवर सुरू आहे. अन्य लढतीत यजमान महाराष्ट्राला ओडिशाकडून ३-६ असा पराभव स्वीकारावा लागला.

हरियाणाने झारखंडविरुद्धच्या लढतीत निर्विवाद वर्चस्व गाजविले. पूर्वार्धात त्यांनी ४-० अशी आघाडी घेतली होती.कर्णधार मनदीप मोरयाने तीन गोल करीत हरयाणाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. अभिषेक व मोहित यांनी प्रत्येकी दोन गोल केले तर जसबीर अँटील, दीपक आणि पंकज यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.

महाराष्ट्राविरुद्धच्या लढतीत ओडिशाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासून नियंत्रण मिळविले होते. पूर्वार्धात त्यांनी ३-१ अशी आघाडी घेतली, उत्तरार्धात महाराष्ट्राने सुधारित खेळाचे प्रदर्शन केले. मात्र तो पर्यंत ओडिशाची सामन्यावरील पकड भक्कम झाली होती. ओडिशाकडून अभिषेकला क्रायाने तीन गोल केले तर अमित चिमार्को, कृष्णातिर्की आणि आशिष टोपनो यांनीप्रत्येकी एक गोल केला. महाराष्ट्राकडून हरी शशिंदगी, मल्हारी चव्हाण आणि रोहन पाटील यांनी प्रत्येकी एक गोल करीत चांगली लढत दिली.

साखळी गटातील अन्य सामन्यात पंजाबने उत्तर प्रदेशचा १-० असा पराभवकरीत सलग दुसरा विजय नोंदविला. त्याचे श्रेय ५७ व्या मिनिटाला हरमानजीतसिंग याने केलेल्या सुरेख गोलास द्यावे लागेल. त्याने हा गोल पेनल्टीकॉर्नरद्वारा नोंदविला. मुलांच्या १७ वषार्खालीलगटात ओडिशाच्या सुदीप चिमार्को याने गोलांचा चौकार मारला, त्यामुळेच त्याच्या संघास महाराष्ट्रावर ७-० असा सफाईदार विजय मिळविता आला. पूर्वार्धात त्यांनी ३-० अशी आघाडी मिळविली होती. सर्वच आघाडीवर त्यांनी प्रभुत्व गाजविले. ओडिशाकडून सुनील जोजो, सुनीतलाक्रा व वसंतलाक्रा यांनी प्रत्येकी एक गोल केला. सतरा वषार्खालील अन्य लढतीत उत्तरप्रदेशने दिल्लीचा ६-० असा दणदणीत पराभव केला. त्यामध्ये अजय यादव याने दोन गोल नोंदविले तर पंकज यादव, सूरजसिंग, कर्णधार सौरभ आनंद आणि राजन गुप्ता यांनी प्रत्येकी एक गोल केला.

निकाल : १७ वर्षांखालील मुले – १) ओडिसा – ७ (सुदीप चिरमाको ५, ३८, ५०, ५३ मि.), सुनील जोजो (१४ मि.), सुनीत लाक्रा (१९ मि.), प्रशांत लाक्रा (५२ मि.) वि. वि. महाराष्ट्र – ०.
२) उत्तर प्रदेश – ६ (अजय यादव ५०, ५६ मि., पंकज यादव ९ मि., सुरजसिंग २९ मि., सौरभ आनंद ३६ मि., राजन गुप्ता ६० मि.) वि. वि. दिल्ली – ०.
२१ वर्षांखालील मुले – १) ओडिशा – ६ (नीलम संजीप शेस १८, २९, ४९ मि., अमित चिरमाको १२ मि., कृष्णा तिर्की ३८ मि., आशिस टोपनो ४३ मि.) वि. वि. महाराष्ट्र – ३ (रोहन पाटील २५ मि., मल्हारी चव्हाण ५२ मि., हारिस शिंदगी ५७ मि.).
२) हरयाणा – १० (मनदीप मोर ३, १३, ४० मि., अभिषेक २४, ४३ मि., मोहित ३१, ४४ मि., जसबिर अंतिल (७ मि.), दीपक ३६ मि., पंकज ५८ मि.) वि. वि. झारखंड – ०.
३) पंजाब – १ (हरमनजीतसिंग ५७ मि.) वि. वि. उत्तर प्रदेश – ०.