खेलो इंडिया- ज्युदोत तन्वीत तांबोळीला सुवर्ण

पुणे | ज्युदोमधील महाराष्ट्राच्या तन्वीन तांबोळी हिने २१ वषार्खालील गटामधील ७० किलो वजनी विभागात सुवर्णवेध घेतला. तिने अंतिम लढतीत राजस्थानच्या संजू चौधरी हिच्यावर शानदार विजय मिळविला.

तन्वीत ही येथील क्रीडा प्रबोधिनीत प्रशिक्षण घेत आहे. ती मधु काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

महाराष्ट्राने रविवारी २१ वषार्खालील मुलांच्या विभागात आणखी तीन ब्राँझपदकांची कमाई केली. त्यांच्या अभिषेक काळवंदे (१०० किलोखाली), वैभव पवार (१०० किलोवर) व तुषार सातपुते (९० किलोखाली) यांचा समावेश होता.