खेलो इंडिया: महाराष्ट्राच्या २१ वर्षाखालील मुलीच्या कबड्डी संघाची विजयी सलामी, सोनाली व असावरीचे सुपरटेन

पुणे- बालेवाडी येथे आजपासून सुरू झालेल्या खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेत २१ वर्षाखालील मुलीच्या गटात महाराष्ट्र विरुद्ध वेस्ट बंगाल यांच्यात सामना झाला.

महाराष्ट्राची स्टार खेळाडू व कर्णधार सोनाली हेलवीने पहिल्याच चढाईत बोनस व १ गुण मिळवून महाराष्ट्र चे खाते उघडले. महाराष्ट्र कडून सोनाली हेलवीने आक्रमक खेळ करत महाराष्ट्रा आघाडी मिळवून दिली. पहिल्या हाल्फ मध्ये प्रतीक्षाने सोनालीला चांगली साथ दिली.

मध्यंतरपर्यत १९-१२ अशी आघाडी महाराष्ट्र संघाकडे होती. वेस्ट बंगाल कडून चांगला खेळ बघायला मिळाला. सुपरटॅकल करत वेस्ट बंगाल ने आपला लोन वाचवले. महाराष्ट्र कडून साक्षीने चांगल्या पकडी केल्या.

सोनाली हेलवीने चपळाईने पहिल्या हाल्फ मधेच सुपरटेन पूर्ण करत जोरदार सुरुवात केली. तर असवरीने सुपरटेन करत महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली. महाराष्ट्राच्या मुलींनी ३३-२७ असा विजय मिळवला. आज संध्याकाळी ८ वाजता महाराष्ट्र २१ वर्षाखालील मुलाचा सामना पंजाब विरुद्ध आहे. थेट प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स वर होईल