खेलो इंडिया: तीन हजार मीटर्समध्ये महाराष्ट्राच्या पूनमला रौप्य

पुणे। महाराष्ट्राच्या पूनम सोनुने हिने तीन हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकाविले. तिला हे अंतर पार करण्यास १० मिनिटे ११.३३ सेकंद वेळ लागला. उत्तरप्रदेशच्या रेबी पाल हिने ही शर्यत १० मिनिटे ९.८८ सेकंदात जिंकंली.

हिमाचलप्रदेशच्या सीमाकुमारी हिने ब्राँझपदक मिळविताना हे अंतर १० मिनिटे ११.९२ सेकंदात पार केले. पूनम या नाशिकच्या खेळाडूने याआधी पाच हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीचे विजेतेपद पटकाविले होते.

महाराष्ट्राच्या पूर्णा रावराणे हिचे गोळाफेकीतील सुवर्णपदक थोडक्यात हुकले. तिने १४.०७ मीटर्सपर्यंत गोळाफेक केली.

उत्तरप्रदेशच्या अनामिका दास हिने १४.१० मीटर्सपर्यंत गोळाफेक करीत सुवर्णपदक जिंकले. राजस्थानच्या कचनार चौधरी हिला ब्राँझपदकाची कमाई केली. तिने १३.८० मीटर्सपर्यंत त्याने गोळाफेक केली.