स्वयंसेवक हाच खेलो इंडिया स्पर्धेचा मुख्य चेहरा

खेलो इंडिया स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात ; पुण्यात ९ ते २० जानेवारी दरम्यान स्पर्धा

पुणे: क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेले किंवा त्या क्षेत्राविषयी आपुलकी असणारे स्वयंसेवक हेच खेलो इंडिया स्पर्धेच्या यशस्वीतेचा मुख्य चेहरा असणार आहे. शिवछत्रपती क्रीडा नगरीत ९ जानेवारी पासून सुरू होणाºया या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्या करित ७५० स्वयंसेवकांची फळी उभारण्यात आली आहे.

या स्पर्धेच्या संयोजनात अनेक युवा हौशी खेळाडूंनी, क्रीडा शिक्षकांनी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दर्शविली आहे. महाराष्ट्राबरोबरच परराज्यांमधील शालेय व महाविद्यालयात क्रीडा शिक्षक किंवा प्रशिक्षक म्हणून काम करणाºयांचा त्यामध्ये मोठावाटा आहे. गेले दोन दिवस येथील क्रीडा नगरीत या स्वयंसेवकांकरिता उद्बोधक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

स्पर्धेच्या निवास, भोजन, वाहन आदी विविध व्यवस्थांकरिता स्वयंसेवक म्हणून काम करणाºयांना संबंधित विभागात कोणकोणती कामे करावयाची आहेत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्वयंसेवकांची निवड करताना शक्यतो त्याला कोणत्याही खेळाचाअनुभव हाच प्रमुख निकष ठेवण्यात आला होता. व्यवस्थापन अभ्यासक्रमाची पदवी किंवा पदविकासंपादन केलेल्यांनाही स्पर्धेसाठी स्वयंसेवक म्हणून संधी देण्यात आली आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पडेलते काम करण्याची तयारी या सर्वच स्वयंसेवकांनी दाखविली आहे. या स्पर्धेसाठी काम करण्याबाबत ते खूपच अधीर झाले आहेत. भारतीय क्रीड ाप्राधिकरणाच्या सरसंचालिका नीलम कपूर यांनी या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले आहे.

या स्पर्धेत सहा हजार खेळाडू, १८०० तांत्रिक अधिकारी, दहा हजारहूनअधिक खेळाडू, ७५० स्वयंसेवक, एक हजार अन्य संघटक असे दहा हजार जण सहभागी होणार आहेत.