खेलो इंडिया: फुटबॉलचे तीन उपांत्य आणि अंतिम सामने पुण्यामध्ये होणार

पुणे। खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सुरु असलेले फुटबॉलचे सामने आज (दि. १६) पासून पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत होणार आहेत. गुरुवारी (दि.१६) तीन उपांत्य सामने होणार असून शुक्रवारी (दि.१७) अंतिम सामने होणार आहेत.

गुरुवारी १७ वर्षाखालील मुलांचा पहिला उपांत्य सामना महाराष्ट्र विरुद्ध पंजाब संघामध्ये सकाळी ९ वाजता होणार आहे. तसेच २१ वर्षाखालील मुलांचा पहिला उपांत्य सामना मिझोरम विरुद्ध गोवा सामना सायंकाळी ५ वाजता आणि पंजाब विरुद्ध केरळ संघाचा दुसरा उपांत्य सामना सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे.

शुक्रवारी १७ वर्षाखालील मुलांचा अंतिम सामना सकाळी ९ वाजता, २१ वर्षाखालील मुलींचा सामना सायंकाळी ५ वाजता आणि मुलांचा सामना सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. फुटबॉलच्या सामन्यांकरीता बालेवाडीतील मैदान आणि इतर सर्व व्यवस्था पूर्ण झाली आहे.