नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुण्यात रंगणार ‘खेलो इंडिया’ स्पर्धा

देशातील जास्तीत खेळाडुंना आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करण्याची संधी मिळावी, तसेच आगामी ऑलिम्पिंक व आशियाई स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने गुणवंत व उदयोन्मुख खेळाडू निवडून त्यांना तंत्रशुध्द प्रशिक्षण व अर्थसहाय्य देणे, खेळासाठी पुरक वातावरण निर्माण करुन सांघिक भावना निर्माण करणे या हेतुने खेलो इंडियाचे आयोजन केले आहे.

खेळ हे सर्वांगिण विकासासाठी महत्वपूर्ण असून नेतृत्व गुणांचा विकास होऊन आगामी काळात देश खेळामध्ये महाशक्ती निर्माण व्हावी हा प्रमुख उद्देश ठेवुन सन 2017 -18 मध्येकेंद्रशासनाद्वारे प्रथमच दिल्लीयेथे “ खेलो इंडिया युथ गेम्स” चे आयोजन केले होते.

यावर्षीकेंद्र व राज्यशासनाच्या सयुक्त विद्यमाने द्वितीय खेलो इंडिया युथ गेम्स, 2019 शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे -बालेवाडी, पुणे येथे दि. 08 ते 20 जानेवारी, 2019 या कालावधीत आयोजित करण्याचे निश्चित झालेले आहे. याबद्दल शनिवारी २२ डिसेंबरला पत्रकार परिषेदत शालेय शिक्षण व क्रीडा राज्यमंत्री विनोद तावडे यांनी माहिती दिली. यावेळी जीटीसीसीचे चेअरमन राजेंद्र सिंग, खेलो इंडियाचे सीईओ संदीप प्रधान, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर, क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल यावेळी उपस्थित होते.

“खेलो इंडिया युथगेम्स” मध्ये विविध प्रकारच्या18 खेळांच्या स्पर्धा, 17 वर्षाखालील व 21 वर्षाखालील मुले व मुली या गटात होणार आहे. या स्पर्धेत संपुर्ण देशामधुन भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारा आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू/संघ तसेच राष्ट्रीय क्रीडा संघटनेद्वारा आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील संघ/खेळाडू, सी.बी.एस.सी. राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडू तसेच स्पर्धा आयोजक राज्याने निवड केलेले खेळाडु असे सुमारे 12,500 खेळाडू, तांत्रिक अधिकारी व स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

दि.08 ते 20 जानेवारी, 2019 या कालावधीत संपन्न होणाऱ्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्यावतीने 18 क्रीडा प्रकारात 17 वर्षे मुले मुली व 21 वर्षे मुले मुली असे 769 खेळाडू ,72 क्रीडा मार्गदर्शक तसेच व्यवस्थापक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.

स्पर्धा कालावधितील अन्य आकर्षणे –

– सर्व क्रीडांगणांच्या प्रवेश द्वारांना महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा पटुंची नावे व त्यांची प्रदर्शनी.

– क्रीडा संकुलात “स्पोर्टस एक्स्पो” व खेळांचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी विशेष क्षेत्र राखीव असणार आहे

– फिटनेस व संतुलित आहार या अत्यंत मौल्यवान विषयांचे मोफत समुपदेशन

– क्रीडामधील कौशल्य विकास व करियरच्या संधी याबाबत मोफत मार्गदर्शन आयोजित केले जाणार आहे.

– महाराष्ट्रातील विविध शाळातील खेळाडूंना विशेष निमंत्रीत केले जाणार आहे.

या स्पर्धेमध्ये खालीलप्रमाणे खेळप्रकार समाविष्ट असुन, सदर खेळांच्या स्पर्धा नमुद स्थळ आणि वेळापत्रकानुसार आयोजित केल्या जाणार आहेत.

.क्र.खेळबाबठिकाणस्पर्धा दिनांक
1जिम्नॅस्टिक्सजिम्नॅस्टिक्स हॉल, बालेवाडी, पुणे.08-13 जानेवारी,2019
2वेटलिफ्टिंगवेटलिफ्टिंग हॉल, बालेवाडी, पुणे.09-15जानेवारी,2019
3ज्युदोटेबल टेनिस हॉल , बालेवाडी, पुणे.09-13 जानेवारी, 2019
4कुस्तीकुस्ती हॉल , बालेवाडी, पुणे.09-12 जानेवारी,2019
5बॅडमिंटनबॅडमिंटनहॉल , बालेवाडी, पुणे.10-13 जानेवारी, 2019
6ॲथलेटिक्सॲथलेटिक्स स्टेडियम , बालेवाडी, पुणे.10-13 जानेवारी, 2019
7शुटींगशुटींग रेंज, बालेवाडी, पुणे.10-16 जानेवारी, 2019
8फुटबॉलफुटबॉलग्राऊाड,मामुर्डी सिबॉसेस,फ्लेम विद्यापीठ, पुणे.10-19 जानेवारी, 2019
9हॉकीमुंबई हॉकी असो. ग्राऊंड, मुंबई7-15जानेवारी,  2019
एनडीएग्राऊंड, पुणे12-20 जानेवारी, 2019
10खो-खोखो खो ग्राउॅड, बालेवाडी, पुणे.13-17 जानेवारी,2019
11जलतरणजलतरण तलाव, बालेवाडी, पुणे.10-15जानेवारी, 2019
12बॉक्सींगबॉक्सींग हॉल , बालेवाडी, पुणे.13-19 जानेवारी 2019
13कबड्डीबॅडमिंटन हॉल , बालेवाडी, पुणे.14-18 जानेवारी 2019
14लॉन टेनिसटेनिस कोर्ट , बालेवाडी, पुणे.14-19 जानेवारी 2 019
15व्हॉलीबॉलबॅडमिंटन हॉल, बालेवाडी, पुणे.14-20 जानेवारी 2019
16बास्केटबॉलटेबल टेनिस हॉल, बॅडमिंटन हॉल, बालेवाडी,पुणे.15-19 जानेवारी 2019
17टेबल टेनिसटेबल टेनिस हॉल, बालेवाडी, पुणे.16-20 जानेवारी 2019
18आर्चरीए.एस. आय. पुणे17-20 जानेवारी 2019

 

“खेलो इंडिया युथगेम्स- 2018”  मध्येमहाराष्ट्राची कामगिरी :-

महाराष्ट्राने गतवर्षी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेच्या पदकतालिकेमध्ये 36 सुवर्णपदकांसह व्दितिय स्थान पटकाविलेले होते.

अ.क्र.राज्याचे नांवसुवर्णरौप्यकास्यएकूण
1हरियाणा382638102
2महाराष्ट्र363243111
3दिल्ली25294094