कि. श्रीकांतने मिळवले फ्रेंच ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद

आज फ्रेंच ओपन सुपर सिरीजची अंतिम फेरी पार पडली. यात भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने विजय मिळवला. हे श्रीकांतचे या वर्षातील चौथे विजेतेपद आहे.

त्याने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानच्या केंट निशिमोटोला पराभूत केले आणि विजेतेपद मिळवले. ३४ मिनिटे चाललेल्या या लढतीत श्रीकांतने निशिमोटोवर सहज विजय मिळवला. त्याने हा सामना २१-१४, २१-१३ अश्या सरळ सेटमध्ये जिंकला.

श्रीकांतने यावर्षी पाचव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता यात त्याने इंडोनेशिया ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि डेन्मार्क ओपन सुपर सिरीज जिंकली आहेत. आज त्याने फ्रेंच ओपन सुपर सिरीजही आपल्या नावावर केले.

त्याचबरोबर एका वर्षात ४ सुपर सिरीज विजेतीपदे मिळवणारा तो पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे.