धोनीकडून मिळली किदांबी श्रीकांतला खास भेट!

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीकडून एक खास भेट मिळाली आहे.

श्रीकांतला धोनीने त्याची स्वाक्षरी केलेली आणि एक संदेश लिहेलेली बॅट भेट म्हणून दिली आहे. याबद्दल श्रीकांतने आनंद झाल्याचे म्हटले असून तो क्षण त्याच्यासाठी फॅनमॉमेंन्ट असल्याचेही सोशल मेडियावर पोस्ट करताना म्हटले आहे.

या बॅटचा फोटो श्रीकांतने सोशल मेडियावर शेयर केला आहे. त्याचबरोबर त्याला कॅप्शन देताना म्हटले आहे की ” या भेटीसाठी धन्यवाद धोनी. मी किती आनंदी आहे हे सांगू शकत नाही. या बॅटमुळे माझा दिवस चांगला झाला. ”

याधीही चेन्नई सुपर किंग्जकडून श्रीकांतला धोनीची 7 क्रमांकाची जर्सी भेट म्हणून देण्यात आली होती.

सध्या जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असणारा श्रीकांत पुढील स्पर्धांची तयारी करत आहे. त्यासाठी त्याने थॉमस कप आणि उबर कप स्पर्धांमधून माघार घेतली आहे.

त्याने मागील महिन्यात ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिश्र संघात सुवर्णपदक आणि एकेरीत रौप्य पदक मिळवले होते.

धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई संघाचा आज आयपीएलच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. त्यांनी याआधीच प्लेआॅफसाठी त्यांचे स्थान पक्के केले आहे. सध्या ते १३ सामन्यात ८ विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

राफेल नदालबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

वानखेडेवर पहिला क्वॉलिफायर हैदराबाद विरुद्ध कोण खेळणार चेन्नई की कोलकता? चौथ्या स्थानसाठी कोणता संघ होतोय पात्र

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार

सामना जिंकण्याआधीच केकेआर प्ले आॅफला पात्र!

नेट रनरेट म्हणजे काय रे भाऊ? का होतेय एवढी चर्चा?