किरॉन पोलार्डचा टी२० क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

ढाका । येथे सुरु असलेल्या बांगलादेश प्रीमियर लीग अर्थात बीपीएलमध्ये किरॉन पोलार्डने टी२० कारकिर्दीतील ५००वा षटकार खेचला. अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा खेळाडू बनला.

त्याने ३९२ टी२० सामन्यात खेळताना ही कामगिरी केली आहे. हा विक्रम करण्यासाठी त्याला या सामन्यापूर्वी ३ षटकारांची गरज होती. त्याने ढाका डायनॅमिट्सकडून आज खेळताना २५ चेंडूत ५२ धावा केल्या. यात त्याने ३ षटकार आणि ५ चौकार खेचले.

टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ख्रिस गेलने मारले आहेत. त्याने ३०९ सामन्यात ७७२ षटकार खेचले आहेत.

टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
७७२ ख्रिस गेल (सामने-३०९)
५०० किरॉन पोलार्ड (सामने-३९४)
३९९ ब्रेंडन मॅक्क्युलम (सामने-२९७)