वाचा: शतक होऊ नये म्हणून पोलार्डने फेकला नो बॉल !

केरान पोलार्ड या विंडीजच्या अष्टपैलू खेळाडूने सध्या सुरु असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खिलाडू वृत्तीला काळिमा फासणारा प्रकार केला. बार्बाडोस त्रिदेण्ट्स विरुद्ध सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स यांच्यातील सामन्यात पोलार्डने इवीन लेविस या फलंदाजाचे शतक होऊ नये म्हणून जाणूनबुजून नो बॉल फेकला.

काल या स्पर्धेच्या साखळी फेरीचे सामने संपले. बार्बाडोस त्रिदेण्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १२८ धावा केल्या. १२९ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या सेंट किट्स अँड नेविस पॅट्रिओट्स संघाने ७ षटकांत १२८ धावा केल्या. त्यातील ७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इवीन लेविसने एकेरी धाव घेऊन स्ट्राइक आपल्याकडे ठेवली.

त्यावेळी संघाला जिंकायला आणि इवीन लेविसला शतकासाठी सुद्धा एका धावेची गरज होती. परंतु बार्बाडोस त्रिदेण्ट्स कर्णधार असलेल्या केरान पोलार्डने नो बॉल टाकून इवीन लेविसचे शतक होऊ दिले नाही.

यापूर्वी इतिहासात असे घडले आहे !
२०१० मध्ये सुरज रणदिव या गोलंदाजाने भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवागला शतकासाठी एका धावेची गरज असताना नो बॉल टाकला होता. त्यामुळे सेहवागचे शतक हुकले होते.

क्रिकेटचा नियम
क्रिकेटच्या नियमाप्रमाणे नो बॉल किंवा वाइड बॉल यांची धाव ही खेळाडूने केलेल्या धावे आधी मोजली जाते. त्यामुळे जर एखाद्या संघाला जिंकायला १ धाव गरजेची असताना गोलंदाजाने नो बॉल टाकला आणि त्याच चेंडूवर फलंदाजाने षटकार जरी खेचला तरी ती एक धाव पकडून संघाला विजयी घोषित करण्यात येते आणि फलंदाजाने केलेल्या धावा मोजल्या जात नाहीत.