सहाव्या पीवायसी-ट्र्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत किंगफिशर संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे । पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित सहाव्या पीवायसी-ट्र्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत किंगफिशर संघाने स्वान्स संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत किंगफिशर संघाने स्वान्स संघाचा 5-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. तन्मय चोभे, मिहिर विंझे, करण पाटील, गायत्री गर्तक, अव्दैत जोशी, संतोष पाटील, अभिषेक तम्हाणे, अनया तुळपुळे यांनी अफलातून खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
किंगफिशर वि.वि स्वान्स – 5-2( गोल्ड खुला दुहेरी गट: नकुल दामले/मकरंद चितळे पराभूत वि तेजस चितळे/बिपिन चोभे 20-21, 13-21; गोल्ड खुला दुहेरी गट: तन्मय चोभे/मिहिर विंझे वि.वि आर्यन देवधर/अदित्य काळे 21-19, 21-20; गोल्ड मिश्र दुहेरी- करण पाटील/गायत्री गर्तक वि.वि अमोल मेहेंदळे/सारा नवरे 21-12, 21-16; सिल्वर खुला दुहेरी गट: अव्दैत जोशी/संतोष पाटील वि.वि सारंग लोगु/सुदर्शन बिहानी 21-12, 21-10; सिल्वर खुला दुहेरी गट: अभिषेक तम्हाणे/अनया तुळपुळे वि.वि यश बहुलकर/मनिष शहा 15-10, 12-15, 11-6; सिल्वर मिश्र दुहेरी: अभिजीत राजवाडे/ वृषी फुरीया पुढे चाल वि विक्रम ओगले/प्रिती सप्रे ; 49वर्षावरील गट: अनिल आगोशे/ चारूदत्त साठे पराभूत वि निलेश केळकर/दत्ता देशपांडे 13-21, 13-21)

कॉमेट्स वि.वि. स्पुटनिक्स – 4-3( गोल्ड खुला दुहेरी गट: सुधांशू मेडशीकर/पराग चोपडा वि.वि सिध्दार्थ निवसनकर/रणजीत पांडे 21-13, 21-13; गोल्ड खुला दुहेरी गट: हर्षवर्धन आपटे/विनित रुकारी वि.वि अनिरूध्द आपटे/अमोद प्रधान 21-17, 21-17; गोल्ड मिश्र दुहेरी- संग्राम पाटील/अदिती रोडे पराभूत वि सिध्दार्थ साठे/गोपीका किंजवडेकर 9-11, 21-11, 12-29; सिल्वर खुला दुहेरी गट: विमल हंसराज/राजशेखर करमरकर वि.वि जयदिप कुंटे/शैलेश लिमये 21-17, 21-13; सिल्वर खुला दुहेरी गट: अभय राजगुरू/राहूल गांगल पराभूत वि आशिष राठे/तन्मय चितळे 2-15, 6-15; सिल्व्हर मिश्र दुहेरी-जनक वाकणकर/भाग्यश्री देशपांडे वि.वि विरल देसाई/ प्रिती फडके 15-12, 15-10; 49वर्षावरील गट: अविनाश जोशी/विवेक जोशी पुढे चाल वि बाळ कुलकर्णी/अनिल देडगे

हॉक्स वि.वि. रावेन्स – 5-2 ( गोल्ड खुला दुहेरी गट: अलोक तेलंग/सुरेश वाघेला पराभूत वि चेतन वोरा/केदार नादगोंडे 14-21, 12-21; गोल्ड खुला दुहेरी गट: बिपिन देव/हर्षद बर्वे पराभूत वि श्रीयांश वर्तक/तन्मय आगाशे 14-21, 21-17, 9-11, 11-6; गोल्ड मिश्र दुहेरी- सुमेध शहा/दिपा खरे वि.वि कुणाल पाटील/दिप्ती सरदेसाई 21-14, 21-16; सिल्वर खुला दुहेरी गट: अश्विन शहा/अमर श्रॉफ वि.वि अनिकेत शिंदे/वेदांत खतोड 21-16, 19-21, 11-8; सिल्वर खुला दुहेरी गट: अनंद घाटे/सचिन काळे वि.वि मंदार विंझे/प्रांजली नादगोंडे 15-10, 12-15, 11-8; सिल्वर मिश्र दुहेरी गट- आकाश सुर्यवंशी/राजश्री भावे वि.वि अयुष गुप्ता/तनया केळकर 15-9, 15-13; 49वर्षावरील गट: हेमंत पाळंदे/हरेश गिलानी वि.वि संदिप साठे/जयकांत वैद्य 21-10, 21-16)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: तर अँडरसन दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नसता

इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो; जो रुट नव्हे, विराटच भारी

कर्णधार कोहलीला ट्रोल करणे आयसीसीच्या चांगलेच अंगलट