या आयपीएल संघाकडे नाही कर्णधार आणि यष्टीरक्षक

आयपीएलच्या ११ व्या मोसमाचा लीलाव पार पडला आहे त्यामुळे आता या बाबतीतील अनेक चर्चांना उधाण आले आहे. या लिलावादरम्यान अनेक खेळाडूंवर कोटींची बोली लागली. तर अनेक धक्कादायक निकालही पाहायला मिळाले आहेत.

या लिलावात सुरवातीपासूनच आक्रमक बोली लावली ती किंग्स इलेव्हन पंजाब संघाने. त्यामुळे या संघाकडून यावर्षी अनेक मोठे खेळाडू खेळताना दिसणार आहेत. परंतु त्यांच्यासमोर समस्या उभी राहिली आहे ती कर्णधार आणि यष्टिरक्षणाच्या जबाबदारीची.

पंजाब संघात युवराज सिंग, आर अश्विन, ख्रिस गेल, डेव्हिड मिलर आणि ऍरॉन फिंच असे कर्णधारपदासाठी पर्याय आहेत, परंतु यातील एकही खेळाडूला नेतृत्वाचा फारसा अनुभव नाही.

मिलरने याआधी काही काळ पंजाबचे नेतृत्व केले होते पण त्याला काही खास करता आले नाही. तसेच फिंचने ऑस्ट्रेलिया संघाचे टी २० मध्ये नेतृत्व केले आहे. त्यामुळे आता पंजाब कोणत्या खेळाडूकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवतात हे पाहावे लागेल.

कर्णधारपदाबरोबरच पंजाबकडे पूर्णवेळ यष्टिरक्षण करू शकतो असा खेळाडूही नाही.

त्यांच्याकडे केएल राहुल आणि अक्षदीप नाथ हे दोन यष्टिरक्षणासाठी पर्याय उपलब्ध आहे, परंतु या दोघांकडेही फारसा यष्टिरक्षणाचा अनुभव नाही. तसेच राहुल यष्टीरक्षण करताना फारसा दिसतही नाही. त्यामुळे आता या समस्यांना पंजाब संघाला तोंड द्यावे लागणार आहे.

हे खेळाडू आहेत पंजाबच्या संघात: अक्षर पटेल, युवराज सिंग, आर अश्विन, करूण नायर,के एल राहुल, ऍरॉन फिंच, डेव्हिड मिलर, मार्कस स्टोयनीस
मयांक अग्रवाल, अंकित राजपूत, मनोज तिवारी, ख्रिस गेल, मोहित शर्मा, मुजीब जदरां, बरिंदरसिंग स्रान, अँड्रयू टाय, बेन द्वारशुईस, परदीप साहू, अक्षरदीप नाथ,मयंक डागर,मंझूर दर