आयपीएल २०१८: किंग्स इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

मोहाली। आयपीएल २०१८ मधील आज दुसरा सामना किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यामध्ये होणार आहे. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजचा सामना पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली येथे संध्याकाळी ४ वाजता सुरु होणार आहे.

या दोन्ही संघांचे कर्णधार बदलल्याने त्यांच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे. पंजाब संघाचे नेतृत्व आर अश्विनकडे देण्यातआले आहे. तो प्रथमच आयपीएलमध्ये एखाद्या संघाचे नेतृत्व करणार आहे. तर दिल्ली संघाचा कर्णधार गौतम गंभीर कर्णधार पदाच्या बाबतीत अश्विन पेक्षा बराच अनुभवी आहे.

याआधी गंभीरच्या नेतृत्वखाली कोलकाता नाईट रायडर्सने दोन वेळा आयपीएलची विजेतेपदे जिंकली आहेत. त्यामुळे आता या दोन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली त्येंच्या संघ कशी कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दिल्लीमध्ये अनेक तरुण खेळाडू आहेत. तर पंजाबमध्ये युवराज सिंग सारखे आक्रमक फलंदाज आहेत. मात्र आज पंजाबच्या ११जणांच्या संघात ख्रिस गेलला संधी मिळालेली नाही. तसेच आज पंजाब संघातून मुजीब जदरां आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे.

असे असतील ११ जणांचे संघ:

किंग्स इलेव्हन पंजाब: के एल राहुल,मयांक अग्रवाल, करूण नायर, युवराज सिंग, डेव्हिड मिलर, मार्कस स्टोयनीस, अक्षर पटेल, अँड्रयू टाय, मोहित शर्मा, मुजीब जदरां

दिल्ली डेअरडेव्हिल्स: गौतम गंभीर, कॉलिन मुनरो, रिषभ पंत, श्रेयश अय्यर, ख्रिस मॉरिस, विजय शंकर, डॅनियल ख्रिस्तियन, राहुल तेवतीया, अमित मिश्रा, ट्रेंट बोल्ट, मोहम्मद शमी