- Advertisement -

भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कस्टर्न पुन्हा होणार प्रशिक्षक!

0 135

मुंबई | भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कस्टर्न यांनी पुन्हा प्रशिक्षक बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतू आपल्याला केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येच हे काम करायला आवडेल असेही ते पुढे म्हणाले. 

सध्या आॅस्ट्रेलिया संघाच्या प्रशिक्षक पदाची जागा खाली असून २०१९मध्ये इंग्लड संघाच्या प्रशिक्षक पदाचीही जागा खाली होणार आहे. त्यामूळे गॅरी कस्टर्न यांनी एकप्रकारे आपण या पदासाठी इच्छूक असल्याचा संदेशच दिला आहे. 

क्रिकेट जगतात अतिशय मान मिळालेल्या प्रशिक्षकांमध्ये कस्टर्न यांचे नाव सर्वात आधी घेतले जाते. त्यांनी भारत तसेच दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. तसेच २०११ ला भारताने जेव्हा क्रिकेट विश्वचषक जिंकला तेव्हा ते संघाचे प्रशिक्षक होते. 

” माझ्या मते आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे दिवसेंदिवस हे क्रिकेटच्या प्रकारावर आधारलेलं होत आहे. त्यामूळे मला केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघाची जबाबदारी सांभाळायला आवडेल. “असे ते म्हणाले. 

यावेळी त्यांनी आॅस्ट्रेलियाच्या प्रशिक्षक पदात रस असल्याचं एकप्रकारे सांगितलं आहे. 

Comments
Loading...
%d bloggers like this: