कोलकत्याला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा.

आयपीएलच्या तिसऱ्या दिवशी होणाऱ्या गुजरात लायन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स सामन्यांमध्ये गुजरातपुढे कोलकात्यातचे आवाहन असणार आहे. मागील वर्षीच्या दोनीही सामन्यांमध्ये गुजरातने कोलकात्याला नमवले होते. आता गुजरात विरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी गंभीरचा कोलकाता संघ सज्ज असेल .

मागील वर्षी कानपूरमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये द्वैन स्मिथने ४ बळी  घेत कोलकात्याच्या फलंदाजीची कंबर मोडली तर कोलकात्यात झालेल्या सामन्यांमध्ये दिनेश कार्तिकने अर्धशतक झळकावून गुजरातच्या संघाला विजय मिळून दिला होता. या वर्षी इंग्लंडच्या जेसन रॉयला संघात समाविष्ट करून गुजरातने आपली फलंदाजी आणखी भक्कम केली आहे तर कोलकात्याने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला आपल्या संघात समाविष्ट करून आपल्या गोलंदाजीची धार वाढवली आहे.

आत गुजरात आपला दबदबा का कोलकत्ता मागील वर्षाचा सूड घेते याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे