आणि पंड्या-राहुलने केली जर्सीची अदलाबदली, चाहते भावुक!

मुंबई | किंग्ज ११ पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात बुधवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबईने ३ धावांनी विजय मिळवला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात ६० चेंडूत ९४ धावा करणाऱ्या केएल राहुलची मात्र चांगलीच निराशा झाली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने २० षटाकांत ८ बाद १८६ धावा केल्या. त्यात पोलार्ड ५० तर कृणाल पंड्या ३२ यांच्या धावांचा समावेश होता. त्यानंतर पंजाबकडून केएल राहुलने ९४ तर अॅराॅन फिंचने ४६ धावा केल्या.

यामुळे मुंबईचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले आहे. या सामन्यात ६ धावांनी शतक हुकलेल्या केएल राहुलचे मात्र सर्वच स्तरातुन जोरदार कौतुक होत आहे. त्याचा टीम इंडियातील संघसहकारी हार्दिक पंड्याने सामन्यानंतर जर्सीची आदलाबदल केली.

एकमेकांच्या खेळाबद्दल आदर दाखवण्यासाठी खेळाडू जर्सीची आदलाबदल करतात. यामुळे सध्या या दोनही खेळाडूंचे सोशल माध्यमांवर जोरदार कौतुक होत आहे.