वरिष्ठ खेळाडू तरुण खेळाडूंना त्रास देतात: केएल राहुल

भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकाविरूद्ध चांगली कामगिरी केली आणि श्रीलंकेचा ३-० आसा धुव्वा उडवला. प्रत्येक खेळाडूने मैदानावर १००% योगदान दिले आहे. मैदानावर लक्ष केंद्रित करून खेळणारे हे खेळाडू मैदानाबाहेर ही एकमेकांबरोबर खूप चांगले संबंध ठेवतात. ड्रेसिंग रुममधील वातावरण ही खूप चांगले आहे आणि सर्व खेळाडू मिळूनमिसळून राहतात.

चेतेश्वर पुजारा आणि के एल राहुल हे दोघेही मैदानावर तर अप्रतिम फॉर्ममध्ये आहेतच पण मैदानाबाहेरीही हे दोन साथीदार चांगेलच फॉर्ममध्ये आहेत. मैदानाबाहेर ते त्यांना प्ले स्टेशनवर फिफा खेळायला आणि एकमेकांची चेष्टा करायला आवडते.

बीसीसीआयने फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात पुजारा राहुलची मुलाखत घेत आहे. त्यात त्यानी राहुलच्या दुखापतीपासून ते राहुलच्या फिफा कौशल्यापर्यंतच्या सर्व गोष्टीवर चर्चा केली आहे.

आपल्या आवडत्या व्हिडीओ गेमबद्दल बोलल्यानंतर पुजारा आपल्या चेष्टा करत त्याला सतत दुखापतींविषयी विचारतो. पुजारा म्हणतो की राहुलचे एनसीएच्या मैदानामध्ये फक्त एकच पाऊल आहे.

राहुलनेनंतर पुजाराला म्हणतो की, त्याला शॉर्ट-लेगची जागा मिळाली आहे आणि त्यामुळेच त्याला अश्या दुखापती होतात. त्यानंतर तो म्हणाला माझ्या सारख्या तरुणाला त्रास देण्यासाठीच पुजारासारखे वरिष्ठ असे करत आहेत.

हे संपूर्ण संभाषण हे विनोदात्मक आणि उपहासात्मक होते.

पुजारा: जेव्हा मी आजकाल एनसीएला भेट देतो, तेव्हा मला केवळ एक पाऊल दिसत आहे आणि ते केएल राहुलचं आहे. तर, त्याबद्दल मला सांग.

राहुल: (हसून) मला हे विचारू नको, एनसीएला जाणे कठीण झाले आहे, मला पुनर्वसनसाठी एनसीएला जायला आवडत नाही. म्हणजे, मी क्रिकेट प्रशिक्षणासाठी आणि सरावसाठी तेथे जाण्यासाठी आनंदी असतो, पण पुनर्वसनसाठी नाही. दुर्दैवाने, माझ्याबरोबर बऱ्याच दुखापती झाल्या आहेत आणि मला वाटते की माझ्या जखमांसाठी मी तुला तितकेच जबाबदार धरतो कारण तूझ्या जागी आता मला शॉर्ट-लेगला थांबावे लागते. तुम्ही तरुण खेळाडूची पिळवणुक करीत आहात.

पुजारा (राहुल द्रविड): नाही, नाही, नाही. मी त्याला येथे थांबवू करू इच्छितो आहे. भारतीय संघात तो सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे आणि त्याला शॉर्ट-लेग फिल्डर म्हणून बनवण्यात आले आहे .

राहुल: मी अजूनही शिकत आहे आणि मी शॉर्ट-लेग मध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु पुजारा हा शॉर्ट-लेगच्या जागेचा बादशहा आहे. प्रत्येक वेळी तो त्या स्थानावर असतो, तेव्हा संघाला विकेट मिळते. चेंडू फक्त त्याला शोधत असतो, म्हणून मी त्याच्यावर दबाव टाकत आहे की त्याने सर्व दिवस तेथे असावे आणि जबाबदारी घ्यावी.

पुजारा: येथे आणखीन एक व्यक्ती जो त्याच्याशी सहमत असेल, तो म्हणजे मुरली विजय. हे दोघेही म्हणतात की मी सर्वोत्तम आहे परंतु मला वाटते की राहुलने बरीच सुधारणा केली आहे.

राहुल: हे स्पष्ट आहे की ड्रेसिंग रूममध्ये अद्यापही ज्येष्ठ आणि कनिष्ठ या गोष्टी चालत आहेत. वरिष्ठ माझ्यासारख्या तरुणाला त्रास देत आहेत.