भारतीय क्रिकेटपटू केएल राहूलने केले इंग्लंडच्या फुटबॉलपटूचे आव्हान पूर्ण

नॉटींगघम। भारतीय क्रिकेटपटू केएल राहूलने मैदानावर टोटेनहॅम हॉट्स्परचा फुटबॉलपटू डेले अलीसारखे सेलेब्रेशन करून आव्हान पूर्ण केले. इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा कर्णधार जो रूटचा झेल घेतल्यावर त्याने असा आनंद व्यक्त केला होता.

इंग्लंडच्या या २२ वर्षीय मिडफिल्डर डेलेने प्रीमियर लीगमध्ये न्युकॅसल विरुद्धच्या सामन्यात केलेले सेलिब्रेशन सध्या ट्विटरवर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. यानंतर त्याने चाहत्यांना त्याच्यासारखी शैली करण्याचे आव्हान दिले होते.

यामुळे राहूलने डेलेचे आव्हान पूर्ण केलेले फोटोज ट्विटरवर चांगलेच व्हायरल झाले आहे.

ट्रेंटब्रिज झालेल्या या कसोटी सामन्यात सलामीला आलेला राहुल धावा करण्यात अपयशी ठरला. क्षेत्ररक्षणात मात्र त्याने कमाल केली. यावेळी त्याने पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ४ झेल घेतले. तसेच दोन्ही डावांत त्याने ३६ आणि २३ अशा धावा केल्या.

हा सामना भारताने २०३ धांवानी जिंकला. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारत २-१ असा पिछाडीवर आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटीतील ५ खास विक्रम

प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचे संपुर्ण वेळापत्रक जाहीर, फायनल होणार मुंबईत

चेल्सीचा मॅनेजर मौरीझियो सॅरी संपवतो दिवसाला सिगरेटची पाच पाकिटे