केएल राहुलला भारतात लवकर परतण्यासाठी चाहत्याने सुचवले हे विमान

पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात चौथ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 5 बाद 112 धावा केल्या असून विजयासाठी भारताला अजून 175 धावांची गरज आहे.

या सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 287 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली आहे. भारताने सलामीवीर फलंदाज केएल राहुलची विकेट पहिल्याच षटकात गमावली होती.

राहुलला पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने त्रिफळाचीत केले. त्यामुळे राहुलला या सामन्यात भोपळाही फोडता आलेला नाही. तसेच राहुल या सामन्यातील पहिल्या डावतही 2 धावा करुन जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला होता.

तसेच त्याला आॅस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या सामन्यातही खास काही करता आले नव्हते. त्याने पहिल्या सामन्यात पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 44 असे फक्त 46 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्याला मागील विंडीज विरुद्धही दोन सामन्यातील 3 डावात मिळून फक्त 37 धावा करता आल्या होत्या.

राहुलने यावर्षी भारताकडून एकूण 12 कसोटी सामने खेळले असून त्यात 22 डावात फलंदाजी करताना त्याने 22.28च्या सरासरीने जेमतेम 468 धावा केल्या आहेत.

त्यामुळे राहुलची मागील काही सामन्यातील अशी खराब कामगिरी पाहून चाहत्यांनी त्याच्यावर सोशल मिडीयातून मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. एका चाहत्याने तर राहुल भारतात लवकरात लवकर परतण्यासाठी कोणत्या विमानाचे तिकीट उपलब्ध आहेत त्याचा फोटो पोस्ट केला आहे.

तसेच काही चाहत्यांनी काही मजेशीर ट्वीट करत टीकाही केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

जाणून घ्या २०१९च्या आयपीएलसाठी कोणते संघ किती परदेशी खेळाडू खरेदी करु शकतात

उद्या होणाऱ्या आयपीएल 2019 लिलावाबद्दल सर्वकाही…

पृथ्वी शॉच्या ऐवजी टीम इंडियात निवड झालेला कोण आहे मयंक अगरवाल?

बॉक्सिंग डे कसोटीसाठी या दोन प्रतिभावान खेळाडूंचा टीम इंडियात समावेश?