संघ पराभूत झाला म्हणून काय झाले, तो विक्रम तर भारतीय खेळाडूच्या नावावर झाला

मुंबई | किंग्ज ११ पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात बुधवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात मुंबईने ३ धावांनी विजय मिळवला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात ६० चेंडूत ९४ धावा करणाऱ्या केएल राहुलची मात्र चांगलीच निराशा झाली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईने २० षटाकांत ८ बाद १८६ धावा केल्या. त्यात पोलार्ड ५० तर कृणाल पंड्या ३२ यांच्या धावांचा समावेश होता. त्यानंतर पंजाबकडून केएल राहुलने ९४ तर अॅराॅन फिंचने ४६ धावा केल्या.

या सामन्यात एक दोन खास विक्रम केले. राहुलने आयपीएलच्या या हंगामात ६५२ धावा केल्या असुन किंग्ज ११ पंजाबकडून केलेल्या एका हंगामातील या सर्वोच्च धावा आहेत. यापुर्वी शाॅन मार्शने २००८मध्ये ६१६ धावा केल्या होत्या.

तसेच त्याने याच सामन्यात शाॅन माॅर्शचाच एकवेळचा संघसहकारी असलेल्या डेविड वार्नरचाही विक्रम मोडला. आयपीएलच्या एका हंगामात धावांचा पाठलाग करताना केएल राहुलने आता ४८२ धावा केल्या आहेत. आयपीएलमधील हा विक्रम आहे. राहुलने ६५२ धावांपैकी ४८२ धावा ह्या दुसऱ्या डावात केल्या आहेत.
२०१६मध्ये डेविड वार्नरने धावांचा पाठलाग करताना ४६८ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

आजचा सामन्यात बेंगलोर जर पराभूत झाले तर….

शेवटचा सामना जिंकुनही मुंबई होऊ शकते आयपीएलमधून बाहेर

महिलांच्या ऐतिहासिक आयपीएल टी२०साठी संघांची घोषणा

9 दिवसांत केएल राहुलच्या नावावर झाले दोन नकोसे विक्रम

संघ पराभूत झाला, परंतु तो अखेरपर्यंत लढला!