बंड्या मारुती सेवा मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत असे होतील बादफेरीचे सामने

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने बंड्या मारुती सेवा मंडळ, मुंबई अयोजिय राज्यस्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत १४ संघांनी बादफेरीत प्रवेश मिळवला असून विजय क्लब व शिवशंकर संघानी थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.

महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण केंद्र, ललित कला भवन, ना म जोशी मार्ग डीलाईल रोड, मुंबई येथे सुरु असलेल्या यास्पर्धेत दुसऱ्या दिवशी बादफेरीचे सामने पार पडले. अंकुर स्पो विरुद्ध मावळी मंडळ यांच्यात झालेल्या लढतीत ४४-२६ असा विजय मिळवत बादफेरीत प्रवेश मिळवला. सुशांत साहिल व मिलिंद कोटले यानी उत्कृष्ट खेळ केला.

गुड मॉर्निंग विरुद्ध ओम कबड्डी यांच्यात चुरशीची लढत झाली. मध्यंतरा पर्यत १८-१३ अशी आघाडी असणाऱ्या ओम कबड्डी संघाला आघाडी कायम ठेवता आली नाही. धीरज रोकडे व सुदेश कुळे याच्या आक्रमक चढाया व अजय शिंदेच्या पकडीनी गुड मॉर्निंग संघाने ३१-२६ असा दुसरा विजय मिळवला. आपल्या दुसऱ्या सामन्यात ओम कल्याण संघाने वीर परशुराम संघाचा २६-१९ असा पराभव केला.

Photo Courtesy: Dinesh Ghadioankar

विजय क्लब ने सुनील स्पो वर ३३-०९ अशी मात दिली. तर अमर क्रीडा मंडळाने ३४-१२ असा उत्कर्ष संघाचा पराभव केला. सत्यम विरुद्ध छत्रपती क्रीडा मंडळ यांच्यात अटीतटीची लढत झाली. मध्यंतरा पर्यत १८-१८ असा बरोबरीत असलेला सामना अंतिम क्षणी सत्यम संघाने ३९-३७ अशी बाजी मारली. गोल्फादेवी संघाने हनुमान क्रीडा मंडलाचा ३१-२७ असा पराभव करत बादफेरीत प्रवेश मिळवला.

बादफेरीचे सामने पुढीलप्रमाणे:-
उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने
१) अमरहिंद विरुद्ध अंकुर स्पो.
२) स्वास्तिक विरुद्ध अमर
३) छत्रपती विरुद्ध गुड मॉर्निंग
४) ओम कल्याण विरुद्ध सत्यम
५) उजाला विरुद्ध गोल्फादेवी
६) मावळी विरुद्ध जयभारत

उपांत्यपूर्व फेरीचे सामने
१) विजय क्लब विरुद्ध उ.उपांत्यपूर्व १ विजयी

२) उ.उपांत्यपूर्व २ विजयी विरुद्ध उ.उपांत्यपूर्व ३ विजयी

३) शिवशंकर विरुद्ध उ.उपांत्यपूर्व ४ विजयी

४) उ.उपांत्यपूर्व ५ विजयी उ.उपांत्यपूर्व ६ विजयी