पहिल्या डावात पहिल्याच चेंडूवर झाला बाद तर दुसऱ्या डावात केला भीमपराक्रम

आॅस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात आज फाफ ड्युप्लेसीने शतकी खेळी केली. त्याने दुसऱ्या डावात ही शतकी खेळी करताना १७८ चेंडूत १२० धावा केल्या. 

याबरोबर त्याने एक खास विक्रमही केला. तो पहिल्या डावात पहिल्याच चेंडूवर ० धावेवर (गोल्डन डक) बाद झाला होता तर दुसऱ्या डावात त्याने शतकी खेळी केली. 

याबरोबर कसोटीत पहिल्या डावात पहिल्याच चेंडूवर ० धावेवर (गोल्डन डक) बाद झाला तर दुसऱ्या डावात शतकी खेळी करणारा तो जगातील ८वा कसोटीपटू बनला आहे. 

यापुर्वी असा कारनामा मोहम्मद अझरुद्दीन,  ईयान बोथम, गॅरी सोबर्स आणि डाॅन ब्रॅडमन या खेळाडूंनी केला आहे. 

फाफ ड्युप्लेसीचे हे कसोटी क्रिकेटमधील ८वे शतक होते तर आॅस्ट्रेलिया विरुद्ध त्याने तिसऱ्यांदा शतकी पराक्रम केला आहे.