चौथी वनडे: भारत ५० षटकांत ५ बाद ३७५

कोलंबो, श्रीलंका । येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने लंकेपुढे ५० षटकांत ३७६ धावांचे लक्ष ठेवले आहे. कर्णधार कोहली आणि सलामीवीर रोहीत शर्मा याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ५० षटकांत ५ बाद ३७५ धावांचा डोंगर उभा केला.

आज शिखर धवन स्वस्तात बाद झाल्यानंतर कोहलीने आणि रोहितने जबदस्त फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाचा वाटा उचलला. कोहलीने ९६ चेंडूत १३१ धावा केल्या तर रोहितने ८८ चेंडूत १०४ धावा केल्या.

कोहली बाद झाल्यावर बढती मिळालेल्या हार्दिक पंड्याला विशेष चमक दाखवता आली नाही आणि तो १९ धावांवर बाद झाला. केएल राहुलही ७ धावांवर बाद झाला.

पुनरागमनाची संधी मिळालेल्या मनीष पांडे आणि ३००वा वनडे सामना खेळणाऱ्या एमएस धोनीने जास्त पडझड होऊ न देता संघाला ३७५ टप्पा पार करून दिला. मनीष पांडेने ४२ चेंडूत अर्धशतक केले तर धोनीने तेवढ्याच चेंडूत ४९ धावा केल्या.

श्रीलंकेकडून अँजेलो मॅथवेजने २ बळी घेतले तर विश्वा फर्नांडो, लसिथ मलिंगा, अकिला धनंजया यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.