दिग्गजांना मागे टाकत विराटने केला हा मोठा विक्रम

बेंगलोर । काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या वनडेत भारतीय संघाला २१ धावांनी पराभूत व्हावे लागले. कर्णधार विराट कोहलीला अनेक दिवसांनी पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही एक कर्णधार म्हणून ह्या खेळाडूच्या नावावर एक खास विक्रम जमा झाला आहे.

कर्णधार म्हणून वेगवान २००० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराटने अव्वल स्थान मिळवले आहे. विराटने केवळ ३६ डावात कर्णधार या नात्याने २००८ धावा केल्या आहेत. त्यात विराटची सरासरी राहिली आहे ७४.३४. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर होता. एबीने ४१ डावात कर्णधार असताना २००० धावा केल्या होत्या.

 

कर्णधार म्हणून वेगवान २००० धावा करणारे खेळाडू

खेळाडूचे नाव डाव
विराट कोहली ३६
एबी डिव्हिलिअर्स ४१
मायकल क्लार्क ४७
एमएस धोनी ४८
इयोन मॉर्गन ४८