आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर सर्वाधिक धावा कोहली पहिला फलंदाज

कोलंबो, श्रीलंका । येथे चालू असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणापासून कुठल्याच फलंदाजांने तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये विराट कोहली एवढ्या धावा केल्या नाही.

विराटने आपले एकदिवसीय पदार्पण १८ ऑगस्ट २००८ ला श्रीलंके विरुद्ध केले. त्याचे कसोटी पदार्पण २०११ ला वेस्ट इंडिज आणि टी-२० पदार्पण २०१० मध्ये झिम्बोंबे विरुद्ध झाले. विराटने एकदिवसीयमध्ये ८३९०, कसोटीमध्ये ४६५८ तर टी-२० मध्ये १७४९ धावा केल्या आहेत. या सर्वप्रकारात मिळून त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४,७८५ धावा केल्या आहेत.

त्याच्या पदार्पणापासून म्हणजेच २००८ पासून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता अवल स्थानी विराजमान झाला आहे. श्रीलंकेच्या कुमार सांगकारला त्याने मागे टाकले आहे. सांगकाराने २००८ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४७८२ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे सांगकाराने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती तरी सुद्धा त्याने १४००० हुन अधिक धावा केल्या आहेत.