लग्नातील रिंगला किस करत विराटने साजरे केले दीडशतक

0 105

सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने खणखणीत दीडशतक केले आहे. हे दीडशतक करताच त्याने त्याच्या लग्नाच्या अंगठीचे चुंबन घेतले आहे.

विराटचे मागच्याच महिन्यात इटली येथे अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत विवाह केला होता. ती या दक्षिण दौऱ्यासाठी विराट सोबत आली होती, परंतु काही दिवसांपूर्वी तिच्या कामानिमित्त तिला परत यावे लागले आहे.

विराटने या सामन्यात २०७ चेंडूत १५० धावांचा टप्पा पार केला. याबरोबरच विराटने कसोटी कर्णधार म्हणून ८ वेळा १५० पेक्षा जास्त धावा करण्याचा डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विराटाचे हे २१ वे कसोटी शतक आहे.

भारतीय संघाने पहिल्या डावात विराटच्या दीडशतकच्या जोरावर सर्वबाद ३०७ धावा केल्या आहेत. विराटने २१७ चेंडूत १५३ धावा केल्या आहेत. भारतीय संघ पाहिल्या डावात २८ धावांनी पिछाडीवर आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: