हा खेळाडू म्हणतो, कसोटीत विराटपेक्षा स्मिथच भारी, दोघांना एकाच संघात पाहायला मजा येईल

आज ऑस्ट्रेलियाचा स्टार कर्णधार स्टिव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमधील २२वे शतक केले आणि पुन्हा एकदा फॅब ४ अर्थात स्मिथ, कोहली, रूट आणि विल्यमसन यांच्यात तुलना सुरु झाली.

यात पहिली प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे इंग्लंडचा माजी कर्णधार आणि समालोचक मायकेल वॉनने दिली आहे. नेहमीच ट्विटरवर काहीतरी ट्विट करून लक्ष वेधून घेणारा
मायकेल वॉन म्हणतो, ” माझ्या मते कोहली हा तिन्ही प्रकारातील सर्वात चांगला खेळाडू आहे. परंतु स्टिव्ह स्मिथ हा कसोटी क्रिकेटमध्ये जास्त चांगला आहे. तरीही मला या दोघांना एकाच संघात खेळताना पाहायला आवडेल. “

“त्याने इंग्लंडविरुद्ध ७वे शतक केले आहे. मोठी गोष्ट आहे. हा जगातील सर्वात मोठा कसोटीपटू आहे का?” असेही मायकेल वॉन आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणतो.

आज स्मिथने केलेले विक्रम थोडक्यात-
-२०१४, २०१५, २०१६ आणि २०१७ अशा चार वर्ष सलग १००० धावा. असं करणारा हेडन (५वेळा)नंतर करणारा दुसरा खेळाडू

-५० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळून अर्धशतकांपेक्षा (२१) शतके (२२) अधिक करणारा स्मिथ केवळ ७वा खेळाडू. भारताकडून कोहली आणि अझरुद्दीन यांनी ही कामगिरी केली आहे.

– ॲशेस मालिकेत ७ शतके करणारा १०वा ऑस्ट्रेलियन खेळाडू

-कर्णधार म्हणून कमी डावात १४ शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्मिथ (डाव-५१) आता तिसरा. ब्रॅडमन (३७) आणि माहेला जयवर्धने (५०) अव्वल.