पराभूत होऊनही विराट कोहलीने पहिल्याच वनडेत केले हे १० विश्वविक्रम

मुंबई । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आज भारत विरुद्ध न्यूजीलँड वनडेत कारकिर्दीतील ३१ वे शतक करताना अनेक विक्रम केले. ते असे

वनडेत सर्वधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ३१ शतकांसह दुसरा. रिकी पॉन्टिंगचा ३० शतकांचा विक्रम मोडला. अव्वल स्थानी ४९ शतकांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर

कर्णधार म्हणून एका वर्षात सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल. विराट (५), गांगुली (५), पॉन्टिंग(५), स्मिथ(५) आणि एबी डिव्हिलिअर्स(५) यांनी ही कामगिरी केली आहे.

स्वदेशात वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरा. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने घराच्या मैदानांवर २० वनडे शतके केली आहेत तर विराट, पॉन्टिंग, हाशिम अमला यांनी प्रत्येकी १३ शतके केली आहेत.

२०० व्या वनडेत शतकी खेळी करणारा एबी डिव्हिलिअर्स नंतरचा केवळ दुसरा खेळाडू

कारकिर्दीतील पहिल्या २०० वनडेत ३१ शतकांसह सार्वधिक शतके करणारा खेळाडू. हाशिम अमला २६ शतकांसह दुसऱ्या स्थानी. परंतु अमला केवळ १५८ सामने खेळला आहे. तिसऱ्या स्थानावर २४ शतकांसह एबी डिव्हिलिअर्स तर १९ शतकांसह गेल चौथ्या स्थानी.

न्यूजीलँड विरुद्ध वनडेत १००० धावा करताना करताना सर्वात कमी डाव खेळले. १७ डावात हजार धावा. डीन जोन्स (१९), वीरेंद्र सेहवाग (२१), जॅक कॅलिस (२३) यांनी कोहलीपेक्षा जास्त डावात ही कामगिरी केली आहे.

वनडेत भारतीय कर्णधाराने वानखेडेवर शतक करायची केवळ दुसरी वेळ. यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ११९६ साली आफ्रिकेविरुद्ध वानखेडेवर ११४ धावांची खेळी केली होती.

भारतीय कर्णधार म्हणून वानखेडेवर सर्वाधिक १२१ धावा. सचिन तेंडुलकरचा ११४ धावांचा विक्रम मोडला.

कोहलीने पहिल्या १००वनडेत १३ शतके केली आहेत तर त्यापुढच्या १००वनडेत तब्बल १८ शतके ठोकली आहेत.

३१ वनडेत शतके करण्यासाठी विराटला केवळ १९२ डाव लागले आहेत तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २७१ डावात ही कामगिरी केली आहे. अन्य कोणत्याही खेळाडूने वनडेत ३१ शतके केली नाहीत.

कर्णधार म्हणून विराट कोहलीने ९१ डावात १९ आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत. या यादीत पॉन्टिंग (४१), स्मिथ (३१) हे खेळाडू अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.