तर विराट होऊ शकतो टी२०मध्ये २ हजार धावा करणारा दुसरा खेळाडू !

राजकोट । विराटला आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात २ हजार धावा करण्यासाठी विराटला आता केवळ १२२ धावांची गरज आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेतील २ टी२० सामने आता बाकी आहेत.

जर तो या मालिकेत २ हजार धावा करू शकला तर टी२० प्रकारात अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा खेळाडू बनेल.

सध्या त्याच्या नावावर ५३ सामन्यात १८७८ धावा आहेत. भारतीय संघाने आजपर्यंत ८६ सामने खेळले असून त्यातील ५३ विराट खेळला आहे.

विराटने उद्याच्या सामन्यात १२ धावा केल्या तर टी२० प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर येईल. सध्या पहिल्या स्थानावर २१४० धावांसह ब्रेंडन मॅक्क्युलम तर दुसऱ्या स्थानावर १८८९ धावांसह तिलकरत्ने दिलशान आहे.

भारताने दिल्ली टी२० सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. उद्याचा सामना जिंकून संघ मालिका विजयासाठी उत्सुक आहे.