विराट कोहलीने केली हाशिम अमलाच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी

कोलकाता । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०वे शतक केले. त्याने यासाठी ३४८ आंतरराष्ट्रीय डाव घेतले आहेत.

५० शतके करताना दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलानेही ३४८ आंतरराष्ट्रीय डाव घेतले आहेत. वेगवान ५० आंतरराष्ट्रीय शतके करताना अमला आणि विराट यांनी सार्वधिक कमी डाव खेळले आहेत.

विराटने वनडेत १९४ डावात ३२ शतके तर कसोटीत १०३ डावात १८ शतके केली आहेत. टी२०मध्ये मात्र विराटला ५१ डावात अजून एकही शतक करता आले नाही.

५० आंतरराष्ट्रीय शतके करण्यासाठी कमी डाव खेळणारे खेळाडू
३४८ हाशिम अमला
३४८ विराट कोहली
३७६ सचिन तेंडुलकर
४१८ रिकी पॉन्टिंग
४६५ ब्रायन लारा
५२० जॅक कॅलिस
६६७ माहेला जयवर्धने

कोहलीच्या पदार्पणापासून कोणत्या खेळाडूने किती शतके केली
५० विराट कोहली
४९ हाशिम अमला
३७ एबी डिव्हिलिअर्स
३६ कुमार संगकारा
३४ डेविड वॉर्नर