विडिओ: विराट कोहलीने करून दिली अझरुद्दीनच्या क्षेत्ररक्षणची आठवण

रांची : येथे चालू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात कर्णधार विराट कोहलीने क्षेत्ररक्षणात चपळता दाखवून ऑस्ट्रेलियाच्या क्रिश्चनला धावचीत केले. विशेष म्हणजे या वेळी विराट सीमेरेषेवर क्षेत्ररक्षण करत होता.

ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ११३ वर ७ बाद अशी होती. तेव्हा क्रिश्चन हा एकमेव मुख्य फलंदाज खेळपट्टीवर होता. त्याच्या साथीला गोलंदाज अँड्रयू टाय फलंदाजी करत होता.

दोनच षटके उरलेली असल्यामुळे जास्तीत जास्त चेंडू क्रिश्चनने खेळावे यासाठी १९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने दोन धावा काढण्याचा प्रयत्न केला. पण सीमेवर असलेल्या कर्णधार विराट कोहलीने चपळता दाखवून चेंडू लगेच उचलला आणि थेट विकेट्सवर मारला आणि क्रिश्चन धावबाद झाला.

त्यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला. जेव्हा सामना चालू झाला तेव्हा डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ६ षटकात ४८ धावा करण्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. परंतु भारताने सामना ५.३ षटकांत ९ गड्यांच्या मोबदल्यात जिंकला.