१० हजार धावा करणाऱ्या कोहलीचे हे आहेत १० खास पराक्रम

विशाखापट्टनम | भारत विरुद्ध विंडीज दुसऱ्या वन-डे सामन्यात आज विराट कोहलीने वन-डे कारकिर्दीतील १० हजार धावांचा टप्पा पार केला. त्याने वन-डेत २१३ सामन्यात ५९.२२च्या सरासरीने एकुण १०००९ धावा केल्या आहेत.

या १० हजार धावांसोबत विराटने वन-डेत अनेक पराक्रमही केले आहेत. त्यातील काही खास आणि निवडक पराक्रम असे- 

-वन-डेत कमी डावात १० हजार धावा करण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर. यापुर्वी हा विक्रम सचिनच्या नावावर होता. 

२०५- विराट कोहली, २०१८

२५९- सचिन तेंडूलकर, २००१

२६३- सौरव गांगुली, २००५

२६६- रिकी पाॅटिंग, २००७

२७२- जॅक कॅलिस, २००९

२७३- एमएस धोनी, २०१८

-वन-डेत कमी सामन्यांत १० हजार धावा करण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर. यापुर्वी हा विक्रम सचिनच्याच नावावर होता. 

२१३- विराट कोहली, २०१८

२६६- सचिन तेंडूलकर, २००१

२७२- सौरव गांगुली, २००५

२७२- रिकी पाॅटिंग, २००७

२८६- जॅक कॅलिस, २००९

२८७- राहुल द्रविड, २००६

-वन-डेत कमी चेंडूत १० हजार धावा करण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर. यापुर्वी हा विक्रम सनथ जयसुर्याच्या नावावर होता. 

१०८१०- विराट कोहली

११२९६- सनथ जयसुर्या

-पदार्पणानंतर सर्वात कमी काळात १० हजार धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर. यापुर्वी हा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर होता. 

१० वर्ष ६७ दिवस- विराट कोहली

१० वर्ष ३१७ दिवस- राहुल द्रविड

-१० हजार धावा करताना सर्वाधिक सरासरी असलेला विराट जगातील पहिला फलंदाज. त्याने १० हजार धावा करताना तब्बल ५९.२४ची सरासरी गाठली आहे.

-१० हजार धावा करताना सर्वाधिक शतके नावावर असलेला फलंदाज. विराटच्या नावावर सध्या ३६ वन-डे शतके आहेत.

-वन-डेत कमी वयात १० हजार धावा करणारा विराट सचिननंतरचा दुसरा खेळाडू. विराटने वयाच्या  २९ वर्ष आणि २५३ व्या दिवशी हा कारनामा केला तर सचिनने २७ वर्ष आणि ३४१ दिवसांचा असताना हा पराक्रम केला.

-विराट कोहलीने ९ हजार ते १० हजार हा वन-डेतील १ हजार धावांचा टप्पा केवळ ११ डावात पार केला.

महत्त्वाच्या बातम्या:

कोहलीच कोहली; एबी डिव्हीलियर्स, सचिनचे विक्रम एका दमात मोडले

विराट कोहली सचिनप्रमाणेच ४० वर्षांपर्यंत खेळणार, जाणुन घ्या काय आहे कारण?

पहिल्यांदाच आजी-माजी कर्णधार कोहली-धोनीबद्दल असे घडले

वयाच्या १५ वर्षी सचिनने जी ड्रेसिंगरुम शेअर केली तिथे ३० वर्षांनी करणार ही गोष्ट

असे एक कारण ज्यामुळे युवराजचा २०१९ विश्वचषकातील पत्ता होणार कट