विराट कोहलीची धोनीच्या या विक्रमाशी बरोबरी

कोलंबो । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आज श्रीलंकेविरुद्ध खेळताना अर्धशतकी खेळी केली. त्याबरोबर विराटने माजी कर्णधार एमएस धोनीच्या एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे.

भारताकडून खेळताना वनडे सामन्यात सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याच्या विक्रमाच्या यादीत कोहली धोनीसह आता चौथ्या स्थानावर आहे. विराटने भारताकडून ७४ वेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यात त्याच्या २९ शतकांचा तर ४५ अर्धशतकांचा समावेश आहे. धोनीनेही ७४ वेळा अशी कामगिरी केली असून त्यात धोनीच्या ६५ अर्धशतकांचा आणि ९ शतकांचा समावेश आहे.

भारताकडून ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा वनडे सामन्यात करण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने भारताकडून १४५ वेळा वनडे सामन्यात अशी कामगिरी केली आहे.

भारताकडून सार्वधिक वेळा वनडे सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारे खेळाडू
१४५ सचिन तेंडुलकर
९४ राहुल द्रविड
९३ सौरव गांगुली
७४ एमएस धोनी / विराट कोहली