कर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण

रविवारी (12 आॅगस्ट) इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर दुसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताला 1 डाव आणि 159 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

या सामन्यानंतर आयसीसीने सोमवारी कसोटी क्रमवारी घोषित केली आहे. यामध्ये लॉर्ड्स कसोटीत चमकदार कामगिरी न करता आल्याने अनेक भारतीय फलंदाजांची क्रमवारीत घसरण झाली आहे.

यात भारताचा कर्णधार विराट कोहलीचीही अव्वल स्थानावरुन दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

एजबस्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटीनंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. तो कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होणारा तो 7वा भारतीय फलंदाज ठरला होता.

मात्र लॉर्ड्स कसोटीत त्याला दोन डावात अनुक्रमे फक्त 23 आणि 17 धावाच करता आल्याने 15 गुण गमवावे लागले आहेत. त्यामुळे त्याचे गुण 934 वरुन थेट 919 झाले आहेत.

या क्रमवारीत आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ 929 गुणांसह पुन्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

याबरोबरच अन्य भारतीय फलंदाजांमध्ये मुरली विजयची 8 स्थानांनी घसरण होऊन तो 33 क्रमांकावर आला आहे. तर दिनेश कार्तिकही 18 क्रमांकाने पिछाडीवर जात 195 व्या स्थानी आला आहे.

पण फलंदाजांमध्ये भारताकडून लॉर्ड्स कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या आर अश्विनची फलंदाजी क्रमवारीत प्रगती झाली आहे. तो 10 स्थानांनी पुढे आला असुन 57 व्या स्थानी विराजमान झाला आहे.

तसेच हार्दिक पंड्यानेही 25 स्थानांची प्रगती करत 74 स्थान मिळवले आहे.

गोलंदाजी क्रमवारीत कुलदिप यादवचीही 13 स्थानांनी घसरण झाली आहे. त्याला लॉर्ड्स कसोटीत एकच विकेट घेण्यात यश मिळाले होते. तो आता क्रमवारीत 70 व्या स्थानी आला आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतही अश्विन आणि पंड्याने प्रगती केली आहे. अश्विन चौथ्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानी आला आहे. तर पंड्या 18 क्रमांकाने पुढे आला असुन त्याने 44 वे स्थान मिळवले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एकही धाव, झेल किंवा विकेट न घेणाऱ्या खेळाडूला मिळाले ११ लाख

अर्जुन तेंडुलकरची लॉर्ड्सच्या मैदानावर क्षणभर विश्रांती

तिसऱ्या कसोटीत आर अश्विन टीम इंडियाचा कर्णधार?