कर्णधार कोहलीचे खणखणीत अर्धशतक

भारतीय कर्णधार विराट कोहलीने आज श्रीलंकेविरुद्ध खेळताना खणखणीत अर्धशतक केले आहे. यासाठी त्याने ३८ चेंडूंचा सामना केला असून त्यात ९ चौकार मारले.

शिखर धवन स्वस्तात बाद झाल्यानंतर रोहित शर्मा बरोबर चांगली भागीदारी करून कोहलीने वेगवान अर्धशतकी खेळी केली आहे. हे कोहलीचे वनडे क्रिकेटमधील ४५ वे अर्धशतक आहे.

सध्या भारतीय संघ १२ षटकात १ बाद ८२ अशा चांगल्या स्थितीत आहे. रोहित शर्मा २३ तर कोहली ५१ धावांवर खेळत आहे.