१९९८मधील सचिनचा सार्वकालीन वनडे क्रमवारीचा विक्रम विराटने मोडला !

दुबई। आज आयसीसीने घोषित केलेल्या वनडे क्रमवारीत विराट कोहलीने एबी डिव्हिलिअर्सला मागे टाकत पुन्हा अव्वल क्रमांक पटकावला. त्याने ही कामगिरी करताना सचिनचाही विक्रम मोडला.

सध्या विराटच्या नावावर रेटिंगचे ८८९ पॉईंट्स आहेत तर एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर ८७२.

भारताकडून सार्वकालीन सर्वाधिक रेटिंग पॉईंट्स यापूर्वी सचिनच्या नावावर होते. त्याने १३ ऑक्टोबर ११९८ साली भारताकडून सार्वधिक आयसीसी वनडे रेटिंग पॉईंट्सचा हा विक्रम केला होता. जगातील सर्व खेळाडूंच्या सार्वकालीन यादीत सचिन १५व्या स्थानी आहे.

विराटने हा विक्रम मोडताना काल न्यूजीलँडविरुद्ध आयसीसी रेटिंग पॉईंट्स ८८९ केले. याबरोबर या यादीत तो १४व्या स्थानी आला आहे.

सध्या या यादीत विराटपुढे सध्या खेळत केवळ एबी डिव्हिलिअर्स आणि हाशिम आमला हे खेळाडू आहेत.

सार्वकालीन वनडेत क्रमवारीत भारतीयांचे रेटिंग पॉईंट्स
८८९ विराट कोहली
८८७ सचिन तेंडुलकर
८८४ सौरव गांगुली
८३६ एमएस धोनी
८८१ मोहम्मद अझरुद्दीन