टाॅप ५- तिसऱ्या कसोटीत विराटने केलेले १० खास पराक्रम

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या डावात १०३ धावांची शतकी खेळी केली.

याबरोबर त्याने काही खास पराक्रम केले. ते असे-

-सर्वाधिक शतके करणाऱ्या कर्धारांच्या यादीत विराट (१६) तिसरा. ग्रॅमी स्मिथने १९३ डावात २५, रिकी पाॅंटींगने १४० डावात १९ तर विराटने ६३ डावात १६ शतके केली आहेत.

-भारताकडून कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट(२३) चौथा. सचिन (५१), द्रविड (३६), गावासकर (३४) आणि सेहवाग (२३) हे अन्य खेळाडू या यादीत आहेत.

-विराटने ६व्यांदा एका वर्षात ५ किंवा त्यापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत.

-विराट कोहलीने कर्णधार म्हणुन १२९ डावात २९ शतके केली आहेत तर फक्त खेळाडू म्हणुन २५० डावात २९ शतके केली आहेत.

-डाॅन ब्रॅडमन, सुनिल गावसकर आणि ग्रॅमी स्मिथनंतर जलद २३ शतके करणारा विराट चौथा खेळाडू

-विराट कोहलीचे हे इंग्लंडविरुद्ध ५वे कसोटी शतक

-विराट कोहलीचे हे इंग्लंडमधील दुसरे कसोटी शतक

-विराटचे हे परदेशातील १३ वे कसोटी शतक

-२०१८मधील हे विराटचे तिसरे कसोटी शतक आहे

-कर्णधार म्हणुन विराटचे हे १६ वे कसोटी शतक

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स कबड्डीत भारतीय पुरुष कबड्डी संघाचा निराशाजनक पराभव

एशियन गेम्स: लक्ष्यने मिळवून दिले भारताला दुसरे रौप्यपदक

एशियन गेम्स: नेमबाज दिपक कुमारला रौप्यपदक