कोहलीची ‘विराट’ गाथा

क्रीडासाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जगविक्ख्यात प्युमा या ब्र्यांडने विराट कोहली सोबत ११० कोटी चा करार ८ वर्षांसाठी केला आहे. क्रिकेट इतिहासाततला हा आजवरचा सर्वात मोठा आणि दीर्घकालीन करार आहे. ह्या करारासोबतच कोहली, प्युमाचा ग्लोबल ब्र्यांड अम्बासाडर पुढे येईल. त्याच्या शिवाय जमैकाचा महान धावपटू उसैन बोल्ट हा देखील सध्या प्युमाचा अम्बासाडर आहे.

कोहली प्युमा सोबत त्यांच्या वेगवेगळ्या प्रोमोशन आणि इतर घडामोडींसाठी कटिबद्ध राहील. कोहली आणि बोल्टच्या आधी फुटबॉलपटू पेले आणि माराडोना हे देखील प्युमा बरोबर जोडले गेले होते. कोहलीला या करारामधून वर्षाला १२-१४ कोटी रुपये निश्चित मिळणार आहेत. प्युमासाठी कोहलीने जाहिरात देखील शूट केली आहे व ती काही दिवसात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्युमासोबत कोहली केवळ भारतातच नाही तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साउथ आफ्रिका, आणि मिडल इस्ट मध्येदेखील प्रोमोशन करणार आहे.