गुजरात फॉरचून जायन्टस – पाटणा पायरेट्स लढणार प्रो कबड्डी ट्रॉफीसाठी

प्रो कबड्डीचा अंतिम सामना गुजरात फॉरचून जायन्टस आणि पाटणा पायरेट्स हे दोन संघ खेळणार असून चेन्नईमधील नेहरू स्टेडियमवर होणार आहे.

गुजरात फॉरचून जायन्टस संघ सध्या चांगल्या लयीत असून दोन्ही आघाड्यांवर काम करत आहे.

गुजरात फॉरचून जायन्टस संघ या मोसमातील सर्वात जास्त गुण मिळविणारा पहिल्या क्रमांकावरील संघ आहे. संघाने मागील २२ सामन्यांपैकी १५ सामने जिंकलेले असून फक्त ४ सामने गमावलेले आहेत. तर ३ सामने बरोबरीत सोडवले आहेत.

गुजरात फॉरचून जायन्टस संघामध्ये रेडर सचिनने २३ सामन्यांमध्ये १६२ गुण मिळविले असून तोच संघातील सार्वधिक गुण घेणारा खेळाडू आहे. संघाचा कर्णधार सुकेश हेडगे १७ सामन्यांमध्ये फक्त ७५ गुण मिळविले आहेत. या मोसमात संघाच्या कर्णधाराला पाहिजे अशी कामगिरी करता आली नसली तरी संघाच्या खेळाडूंनी संघाला पहिल्या क्रमांकावर राहण्यासाठी सतत चांगला खेळ केला आहे.

पाटणा पायरेट्स संघ या मोसमात गुणांमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. संघाने मागील २२ सामन्यांपैकी १० सामने जिंकले तर ७ सामने हरले व ५ सामने बरोबरीत सुटले आहेत. संघाचा कर्णधार प्रदीप नरवालने २५ सामन्यांमध्ये ३२५ गुण मिळविले असून संघामध्ये सर्वात जास्त गुण त्याच्या नावावर आहेत. या मोसमात ऐकून गुण, रेड गुण, यशस्वी रेड, सुपर रेड, सुपर टेन या सर्वांमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे.

गुजरात फॉरचून जायन्टस संघाने सर्वात जास्त सामने जिंकलेले असल्यामुळॆ उद्याचा सामना जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करणार. तसेच पाटणा पायरेट्स संघाचा कर्णधार प्रदीप नरवाल शेवटच्या सामन्यात सहजासहजी हार मानणार नाही.

त्यामुळे हा सामना कबड्डीप्रेमींसाठी खास ठरणार आहे.