बीसीसीआयची फसवणूक करणारा खेळाडू आयपीएलमध्ये चमकला

जयपूर। 22 एप्रिलला तडाखेबंद खेळी करून मुंबई इंडियन्सविरूद्ध कृष्णप्पा गॉथमने राजस्थान रॉयल्सला 3 विकेट्सने विजय मिळवून दिला होता. पण हाच कृष्णप्पा गॉथम एकदा बीसीसीआयशी खोटे बोलल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

मागच्या वर्षी कृष्णप्पा दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया रेड संघाकडून खेळत होता. या स्पर्धेच्या इंडिया रेड विरूद्ध इंडिया ग्रीन यांच्यातील पहिल्याच सामन्यात कृष्णप्पाने 5 विकेट्स घेतल्या होत्या. पण या सामन्यानंतर कृष्णप्पाने बीसीसीआयला टायफॉइड झाले असल्याचे सांगुन घरी जाण्याची परवानगी मागितली होती.

पण तो घरी जाऊन अराम न करता सरळ कर्नाटक प्रीमियर लीग खेळायला गेला. हे जेव्हा बीसीसीआयला समजले. तेव्हा बीसीसीआयने त्याच्यावर कारवाई करताना दुलीप ट्रॉफी आणि भारत अ संघात खेळण्यासाठी त्याच्यावर बंदी घातली.

यानंतर चुकीची जाणीव झाल्यावर कृष्णप्पाने माफी मागितली. त्याच्या या माफीनंतर बीसीसीआयने त्याच्यावरील बंदी मागे घेतली.

त्यांनतर मात्र कृष्णप्पाने रणजी ट्रॉफीच्या २०१७-१८ च्या मोसमात चांगली कामगिरी करताना कर्नाटककडून ८ सामन्यात २२. २३ च्या सरासरीने ३४ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या देवधर ट्रॉफीमधेही ३ सामन्यात २९.८० च्या सरासरीने ५ विकेट्स घेतल्या.

कृष्णप्पाला त्याच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उत्तम कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने यावर्षीच्या आयपीएल लिलावात ६.२ कोटी खर्च करून संघात सामील करून घेतले होते. त्याने आत्तापर्यंत यावर्षीच्या आयपीएल मोसमात ४८ धावा केल्या आहेत आणि ३ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-अबब! पुढील ५ वर्षात होणार क्रिकेटचे ६ वर्ल्डकप 

-संपूर्ण वेळापत्रक: असे होतील भारताचे विश्वचषक 2019चे सामने 

-यारे या सारे या! आता १०४ देश खेळणार आंतरराष्ट्रीय टी२० सामने 

-ना धोनी- ना विराट, आयपीएलमध्ये हवा तर याच खेळाडूची 

-धोनी चाहत्यांसाठी ही आहे महत्त्वाची आकडेवारी 

-या कारणामुळे विराटला झाला 12 लाख रूपयांचा दंड 

-बीसीसीआयची फसवणूक करणारा खेळाडू आयपीएलमध्ये चमकला

-पराभव झाला तरीही हा विक्रम करत कोहली भाव खाऊन गेला 

-असा एक कारनामा ज्यासाठी टी२०मध्ये खेळाडू करतात जिवाचे रान