संतोषकुमार घोष क्रिकेट स्पर्धेत केआरपी इलेव्हन आणि न्यू ईरा जेतेपदासाठी झुंजणार

मुंबई:  केआरपी इलेव्हनने सातव्या संतोषकुमार घोष 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना प्रतिस्पर्धी दादर पारशी कॉलनीचा सरस रन कोशंटवर पराभव केला.

आपल्या प्रतिस्पर्धांच्या 265 या धावसंख्येला त्यांनी अतिसावध फलंदाजी करत 111 षटकांमध्ये 5 बाद 253 असे उत्तर दिले. त्यामध्ये आयुष जेठवा (47), सौरभ सिंग (35), निशांत कदम (40), गौरव कुमार (ना.56) आणि देवकरण परमार (ना. 37) यांच्या भूमिका मोलाच्या ठरल्या.

स्पोर्टिंग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल फाऊंडेशनने आयोजित केलेल्या व बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक यांचे सहकार्य लाभलेल्या स्पर्धेची अंतिम फेरी येत्या 3 आणि 4 मे रोजी हिंदु जिमखान्यावर होईल.

आज 2 बाद 15 वर खेळाला सुरूवात करणाऱया केआरपीची खरी भिस्त होती आयुष्य जेठवावर. त्यामुळेच तो तसा लवकर बाद झाल्याने केआरपीची 3 बाद 84 अशी स्थिती झाली.

त्यामुळेच मग नंतरच्या फलंदाजांनी विकेट न गमावण्याची निती अवलंबताना बचावावरच भर दिला. सौरभ सिंगने तर आपल्या 35 धावांसाठी 244 मिनीटे व 214 चेंडू फलंदाजी केली.

दादर संघाचा डावरा फिरकीवीर शुभम खरात याचा  अचूक माराही त्यासाठी कारणीभूत ठरला. त्याने 23 षटके टाकली ज्यापैकी चक्क 22 निर्धाव होती. तसे पाहायला गेले तर

आयुष(47 धावा), गौरव (56) यांनीही बचाव हाच जिंकण्याचा मार्ग हे किती योग्य हे सिद्ध केले. मात्र सामना वाचविताना संघाला विजयही मिळवून देण्यात गौरव यशस्वी ठरला. तोच सामनावीर ठरला. त्याने देवकरण परमार बरोबर सहाव्या विकेटसाठी 72 धावांची अभेद्य भागीदारी केली ती निर्णायक ठरली.

संक्षिप्त धावफलक

दादर पारशी कॉलनी-76.3 षटकांत 265 (आदित्य वारंग 31, अनुराग नायर 107, रोनित ठाकूर 34, उमर खान 44, आयुष जेठवा 49 धावांत 3 बळी, अथर्व भोसले 51 धावांत3 बळी, निशांत कदम 36 धावांत 2 बळी)

विजयी वि. केआरपी इलेव्हन 111 षटकांत 5 बाद 253 ( वेदप्रकाश जैसवाल 21, आयुष जेठवा 47, सौरभ सिंग 35, निशांत कदम 40,गौरव कुमार ना. 56, देवकरण परमार ना. 37, उमर खान 64 धावांत 2 बळी)

सामनावीर – गौरव कुमार