मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू ठरला कृणाल पंड्याची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट; घडला हा विलक्षण योगायोग

कोलकता। आज(1 नोव्हेंबर) भारत विरुद्ध विंडीज संघात इडन गार्डनवर पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात विजयासाठी भारतासमोर विंडीजने 110 धावांचे आव्हान ठेवले आहे. विंडीजचा डाव 20 षटकात 8 बाद 109 धावांवर संपुष्टात आला आहे.

या सामन्यातून भारताकडून कृणाल पंड्या आणि खलील अहमदने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पदार्पण केले आहे. तसेच हा सामना कृणालचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे.

पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कृणालची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट ही विंडीजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड ठरला आहे. कृणालने पोलार्डला 10 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बाद केले. पोलार्डचा झेल मनिष पांडेने घेतला आहे.

या विकेटमुळ एक विलक्षण योगायोग पहायला मिळाला आहे. कृणाल आणि पोलार्ड हे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स या एकाच संघाकडून खेळतात. विषेश म्हणजे या सामन्यात पोलार्डचा झेल पकडणारा मनिष पांडे हा मुंबई इंडियन्सकडून 2008 च्या आयपीएलमध्ये खेळला आहे.

तसेच या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

दिनेश कार्तिकने संगकाराला टाकले मागे; धोनीचाही विक्रम आहे धोक्यात

‘पंड्या ब्रदर्स’ टी२० मध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणारी ठरली दुसरीच भावांची जोडी

‘हिटमॅन’ रोहित शर्माला ‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलला मागे टाकण्याची संधी

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १३- तामिळनाडूचा वन मॅच वंडर