पंड्या ब्रदर्स खेळणार २०१९ विश्वचषकात?

मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याने इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या 2019 च्या विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

त्याने 2019 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याकडे लक्ष असल्याचे मुंबई इंडियन्सच्या वेबसाइटला माहिती दिली आहे की “माझे अंतिम ध्येय हे देशासाठी खेळण्याचे आहे. भारतासाठी विश्वचषकात खेळणे हे माझे पुढचे लक्ष्य आहे.”

“मी एकेका स्पर्धेनुसार किंवा असे म्हणू शकतो की एकेका सामन्यानुसार विचार करत आहे. जर मी यात सातत्य ठेवले तर मला जे हवे आहे ते मला मिळेल. त्यामुळे नक्कीच शेवटचे लक्ष्य हे भारताकडून 2019 चा विश्वचषक खेळण्याचे आहे. मला आशा आहे की मी ज्याप्रमाणे खेळत आहे तसे मी ते ध्येय गाठेल.”

कृणालने अजून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही. मात्र त्याची जुलैमध्ये इंग्लंड विरुद्ध पार पडलेल्या टी20 मालिकेसाठी भारताच्या वरिष्ठ संघात निवड झाली होती. परंतू त्याला 11 जणांच्या संघात स्थान मिळाले नव्हते.

याबद्दल सांगताना कृणाल म्हणाला, ” जेव्हा मी आणि हार्दिकने पहिल्या टी20 सामन्यावेळी भारताची ड्रेसिंगरुम शेअर केले होती तेव्हा आमच्या दोघांचे स्वप्न सत्यात उतरले होते. ती खूप मस्त भावना होती.”

कृणालचा लहान भाऊ हार्दिक पंड्याने भारताकडून 2016 मध्येच भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.

तसेच कृणाल सध्या चौरंगी मालिकेत भारत अ संघाकडून खेळत आहे. त्याची जून-जुलै महिन्यात भारत अ संघात इंग्लंड दौऱ्यासाठीही निवड झाली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या मुख्य प्रशिक्षकाला डच्चू

एशियन गेम्स: भारताला दिवसाच्या सुरुवातीलाच दोन कांस्यपदके

आयपीएलमध्ये या दोन संघांसाठी असतील दोन आॅस्ट्रेलियन प्रशिक्षक