लंडनमध्ये ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेत फडकला कोल्हापूरचा झेंडा

कोल्हापूरचा थाट हा काही वेगळाच, तिथली माणसही जीवाला जीव देणारी, अश्याच या छत्रपतींचा वारसा लाभलेल्या ऐतिहासिक शहरात आज एक अभिमानस्पद घटना घडलीय. करवीर नगरीचे खासदार धनंजय महाडिक यांचा पुत्र कृष्णराजने लंडनमध्ये ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेमध्ये दैदिप्यमान अशी कामगिरी करून विजय संपादन केला आहे. तब्बल १९ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कुणी भारतीय रेसरने या स्पर्धेत विजेतेपद पटकावल आहे.

विदेशात जाऊन कोल्हापूरचा झेंडा रोवणाऱ्या कृष्णराजवर सगळ्या स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. १९ वर्षांपूर्वी रेसर नरेन कार्तिकेनने अशी कामगिरी केली होती त्याच्यानंतर अशी कामगिरी करणारा कृष्णराज हा दुसराच खेळाडू आहे. भारतात सध्याच्या काळात राजकीय मंडळीची मुलं राजकारणात येण्याचं स्वप्न पाहतात. पण कृष्णराज त्याला अपवाद आहे.

सचिन आमुणेकर (टीम महा स्पोर्ट्स)