केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत स्पेनच्या निकोला कुहन याचा मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय

दुहेरीत अर्जुन कढे व साकेत मायनेनी या जोडीची आगेकूच

पुणे |  एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत स्पेनच्या निकोला कुहन याने स्लोवाकियाच्या सातव्या मानांकित आंद्रेज मार्टिनवर सनसनाटी विजय मिळवत दिमाखात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिसम्हाळुंगे बालेवाडी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 18वर्षीय जागतिक क्र.281 असलेल्या स्पॅनिश खेळाडू निकोला कुहन याने जागतिक क्र.191 असलेल्या स्लोवाकियाच्या आंद्रेज मार्टिनचा 6-2, 6-3असा सहज पराभव केला. अन्य लढतीत भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या आर्यन गोविसमनीष सुरेशकुमार यांचे पहिल्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्र.189असलेल्या कॅनडाच्या ब्रेडन चेन्यूरने भारताच्या आर्यन गोविसला 6-3, 6-1असे पराभूत केले. तिसऱ्या मानांकित स्वीडनच्या इलियास यमेर याने भारताच्या मनीष सुरेशकुमारला 6-4, 6-1असे नमविले. हा सामना 1तास चालला.

दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या अर्जुन कढे व साकेत मायनेनी या जोडीने परिक्षित सोमाणी व दक्षिणेश्वर सुरेश यांचा 6-1, 6-1असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. याआधीच्या एकेरीच्या अंतिम पात्रता फेरीत इटलीच्या फ्रान्सिस्को विलार्दोइस्राईलच्या बेन पेटेलजर्मनीच्या लुकास गेरच आणि सेबस्तियन फॅंसीलव या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून मुख्य फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी:
फ्रान्सिस्को विलार्दो(इटली)वि.वि.डनयिलो कलचिंको(युक्रेन)6-3, 5-7, 7-5;
बेन पेटेल(इस्राईल)वि.वि.विक्टर डुरासोविक(नॉर्वे)4-6, 6-3, 6-4;
लुकास गेरच(जर्मनी)वि.वि. बेंजमीन हसन(जर्मनी)[5]6-4, 6-0;
सेबस्तियन फॅंसीलव(जर्मनी)(6)वि.वि.माईक लेस्क्यूर(फ्रांस)6-4, 5-7, 6-2;

मुख्य ड्रॉ(पहिली फेरी):
ब्रेडन चेन्यूर(कॅनडा)वि.वि.आर्यन गोविस(भारत)6-3, 6-1
इलियास यमेर(स्वीडन)(3)वि.वि.मनीष सुरेशकुमार(भारत)6-4, 6-1;
डॅनियल मासूर(जर्मनी)वि.वि.जेले सेल्स(नेदरलॅंड)6-4, 6-4;
निकोला कुहन(स्पेन)वि.वि.आंद्रेज मार्टिन(स्लोवाकिया)(7) 6-2, 6-3;

दुहेरी गट: पहिली फेरी:
अर्जुन कढे(भारत)/साकेत मायनेनी(भारत)वि.वि.परिक्षित सोमाणी(भारत)/दक्षिणेश्वर सुरेश(भारत) 6-1, 6-1.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी

मुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय

नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच

अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल

त्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर!