पहा: काय म्हणतोय हॅट्रिक मॅन कुलदीप यादव

कोलकाता । काल भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघावर ५० धावांनी विजय मिळवला. यात हॅट्रिक विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवचे विशेष कौतुक झाले. तो भारताचा अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा वनडे गोलंदाज बनला.

सामन्यांनंतर बीसीसीआय टीव्हीसाठी भुवनेश्वर कुमारने खास कुलदीपची मुलाखत घेतली. यात कुलदीपने या सामन्यातील अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या.

कुलदीप म्हणतो, ” या सामन्यात माझी सुरुवात खूप खराब झाली. परंतु कमबॅक करून हॅट्रिक घेतल्यामुळे छान वाटत आहे. कधी स्वप्नांतही विचार केला नव्हता की खराब सुरुवात होऊनही हॅट्रिक मिळेल. ”

सामना सुरु असताना तो काय विचार करत होता या प्रश्नावर तो म्हणतो, ” एका बाजूने चांगली गोलंदाजी होत नव्हती. म्हणून दुसऱ्या बाजूने एक विकेट घेऊन ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण करायचा माझा प्रयत्न होता. तेव्हा विकेट्सची पण गरज होती. ”

कोलकाता शहराबद्दल बोलताना कुलदीप थोडा भावनिक होतो. तो म्हणाला, ” आपण जर कोणत्या मैदानावर ४ वर्ष खेळत असू तर खूप सोपं जात. एक प्रकारचा आशावाद असतो की याठिकाणी चांगली कामगिरी करायचीच आहे. ”

या मालिकेतील तिसरा वनडे सामना होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर येथे २४ सप्टेंबर रोजी होणार आहे.