मुलींना बघून काय प्रतिक्रिया देतात भारताचे हे दोन युवा फिरकीपटू

आज बीसीसीआयने एक विडिओ पोस्ट केला आहे ज्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने भारतीय युवा गोलंदाज युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव याची मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीत रोहितने त्यांना पहिलाच प्रश्न विचारला की “तुमचा चाहता वर्ग मोठा आहे. या चाहत्या वर्गाला तुम्ही कसे सामोरे जाता विशेषतः महिला वर्गाला?”

या प्रश्नाचे उत्तर देताना युवा फिरकी गोलंदाज चहल म्हणाला की “तसा तर मी खूप बोलतो पण जेव्हा एखादी मुलगी समोर येते तेव्हा माझा आवाज निघत नाही. मी जर ५-६ वर्षांपासून कोणाला ओळखत असेल तर त्यांच्याशी बोलायला सोपं जात. बाकी वेळेस जर पहिल्यांदाच माझ्यासमोर कोणी आले तर मी फक्त स्मितहास्य देऊन पुढे जातो.”

रोहितच्या याच प्रश्नावर कुलदीप यादव म्हणाला की, “माझ्यासाठी ही समस्या नाही. कारण साधारणपणे मी जास्त बोलतच नाही. जर मी कोणाला ओळखत असेल तर माझी थोडीफार बातचीत होते. नाहीतर मी सुद्धा चहल सारखेच करतो. मी सुद्धा खूप लाजाळू आहे. मी कधी जास्त मुलींच्या आजूबाजूला नसतो. अगदी शाळेत असल्यापासूनच माझ लक्ष सरावावरच जास्त होत. पण या गोष्टी मी हाताळू शकतो ते इतकही अवघड नाहीये.”

नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया वनडे मालिकेत या दोन्हीही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. युजवेंद्र चहलने ५ सामन्यांच्या मालिकेत ४ सामन्यात ६ बळी घेतले तर कुलदीप यादवने एका हॅट्ट्रिक घेत ७ बळी घेतले आहेत.