६ विकेट्स घेणारा कुलदीप यादव म्हणतो हाच संघ जिंकणार फिफा विश्वचषक

नॉटिंगहॅम | भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या वनडेत भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा आणि कुलदीप यादवने चमकदार कामगिरी केली.

६ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवला या सामन्यात सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

हा सामना झाल्यावर नेहमीप्रमाणे चमकदार खेळी केलेल्या कुलदीप यादवची केएल राहुलने मुलाखत घेतली. यावेळी त्याला फिफा विश्वचषकाबद्दल प्रश्न विचारण्यात आले.

यावेळी कुलदीपने आपण फ्रान्सला पाठींबा देणार असल्याचे सांगितले.

“फिफा विश्वचषक सुरु होण्यापुर्वी मी ब्राझीलला पाठिंबा देत होतो. पंरतु ते बेल्जीयमविरुद्ध पराभूत झाले. आता मी अंतिम फेरीत फ्रान्सला पाठींबा देणार आहे. ते नक्की विश्वचषक जिंकतील. ” असे यावेळी कुलदीप केएल राहुलच्या एका प्रश्नावर म्हणाला.

टीम इंडियामध्ये कुलदीप ठेवतो सर्व सामन्यांची माहिती-  

सध्या फिफा विश्वचषक सुरु आहे. भारतीय संघातील सध्याचा सर्वात यशस्वी गोलंदाज कुलदीप यादव हा विश्वचषक खूपच जवळुन पहात आहे. विश्वचषकाबद्दल तो सर्व माहिती ठेवतो. याची माहिती खुद्द कुलदीपचा संघसहकारी असलेल्या केएल राहुलने दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

आहे जगातील सर्वात स्फोटक खेळाडू परंतू फलंदाजीत केला नकोसा विक्रम

सलग ७ वनडे मालिकांत ७ शतके करणारा रोहित शर्मा जगातील एकमेव खेळाडू

या वर्षी पहिल्या ६ महिन्यांतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा करणारे ४ खेळाडू

आता मास्टर ब्लास्टर, किंग कोहली आणि हिटमॅनच्या नावावर आहे हा खास विक्रम

भारतीय वनडे संघाचे २४ कर्णधार झाले, पण जे विराटला केले ते कुणालाही जमले नाही

इतिहासात: आम्ही आलोय.. भारताचा क्रिकेटजगताला संदेश..